Saturday, April 20, 2024

राकेशला अभिषेकचा सर्वात मोठा स्पर्धक मानायच्या जया बच्चन; मुलाला सांगितले होते, ‘याच्यापासून सावध राहा’

‘तुम बिन’ या चित्रपटातून २००१ साली पदार्पण करणारा अभिनेता राकेश बापट आजकाल ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये आपली दमदार झलख दाखवत आहे. दरम्यान, त्याची एक जुनी मुलाखत समोर आली आहे. ज्यात त्याने सांगितले आहे की, जया बच्चन त्याला आपला मुलगा अभिषेक बच्चनची स्पर्धा मानतात. याबद्दल स्वतः अभिषेकने राकेशसमोर एका चर्चेदरम्यान कबूल केले होते.

बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी राकेश बापटने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, जया बच्चन आपला मुलगा अभिषेक बच्चनला त्याच्यापासून सावध राहण्याचा सल्ला द्यायच्या. बच्चन कुटुंबासोबत राकेशची पहिली भेट जुलै २००१ मध्ये झाली होती, तेव्हा तो ‘तुम बिन’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला गेला होता. त्याचवेळी १३ जुलै रोजी अमिताभ बच्चन यांच्या ‘अक्स’ या चित्रपटाचे प्रदर्शन ‘तुम बिन’च्या आधी होते.

राकेश म्हणाला होता की, “आम्ही पार्किंगमध्ये थांबलो होतो. जेव्हा मी अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांना बाहेर येताना पाहिले. जयाजींनी मला पाहिले आणि त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, तूच बापट आहेस ना? मला तुला भेटून अभिमान वाटत आहे. तू खूप हुशार आहेस. मी सतत अभिषेकला तुझ्यापासून सावध राहायला सांगते.”

जया यांच्यासोबत संभाषणादरम्यान, अभिषेक तिथे आला आणि राकेशला मिठी मारली आणि म्हणाला, “जेव्हाही तुझ्या चित्रपटाचा प्रोमो येतो, तेव्हा माझी आई मला फोन करते आणि म्हणते की याच्यापासून सावध राहा, याच्याशी तुझी सर्वात मोठी स्पर्धा आहे.”

अमिताभ बच्चनने ‘तुम बिन’ चित्रपटाचे कौतुक केले
राकेश म्हणाला की, “अचानक मी लिजेंड्सच्या समोर आलो आणि मला काय बोलावे ते समजले नाही. बच्चन यांनी मला सांगितले की, ‘तुम बिन’ एक चांगला चित्रपट दिसत आहे. बच्चन कुटुंबाला वैयक्तिकरीत्या भेटून माझे संपूर्ण कुटुंब खूप आश्चर्यचकित झाले. माझे आई-वडील हसूनच बेशुद्ध होणार होते.”

राकेश पुढे म्हणाला, “माझे वडील माझ्या अभिनय व्यवसायाच्या विरोधात होते. मी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती, पण या वाक्यानंतर त्यांची संपूर्ण वृत्तीच बदलली. मी काहीतरी काम करत आहे हे येथे सिद्ध झाले.”

राकेशने अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘तुम बिन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘दिल-विल प्यार-व्यार,’ ‘तुमसे मिलकर रॉंग नंबर,’ ‘नाम गुम जायेगा,’ ‘कोई मेरे दिल में है,’ ‘कौन है जो सपने में आया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तो दिसला आहे. जेव्हा त्याची चित्रपट कारकीर्द यशस्वी झाली नाही, तेव्हा राकेशने टीव्ही शो ‘साथ फेरे: सलोनी का सफर, ‘मेरीदा: लेकिन कब तक,’ ‘कुबूल है’ आणि ‘तू आशिकी’ मध्येही काम केले आहे. डान्स रियॅलिटी शो ‘नच बलिये ६’ नंतर, राकेश आता रियॅलिटी ‘शो बिग बॉस ओटीटी’चा एक भाग आहे. जिथे त्याची आणि शमिता शेट्टीची केमिस्ट्री चांगलीच पसंत केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पवित्र रिश्ता २.०’चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला; चाहते म्हणाले, ‘सुशांतशिवाय सर्वकाही अपूर्ण’

-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘नुसती क्यूट आहेस तू’, म्हणत वीणा जगतापच्या फोटोवर चाहत्याने केली लक्षवेधी कमेंट

हे देखील वाचा