Sunday, May 19, 2024

जैद हदीदसोबतच्या किसिंग सीनवर आकांक्षाने तोडले मौन, ‘मला खूप…’

बिग बॉस ओटीटी’चा सीझन 2 सुरू झाल्यापासून चाहत्यांच्या मनावर चांगलच अधिराज्य गाजवत आहे. त्यातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होताना दिसतात. या शोमध्ये आत्तापर्यंत बरेच वाद झाले आहेत. या शोमध्ये डियर गेम खेळला जातो. त्याच खेळा दरम्यानच्या आकांक्षा पुरी आणि जैद हदीदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

आकांक्षा पुरी (Akanksha Puri) आणि जैद हदीदच्या व्हिडिओने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिावर खूप व्हायरल झाला आहे. यावर लोकांनी चांगलीच टिका केली आहे. लोकांच्या या टिकेला आकांक्षाने सडेतोड उत्तर दिले आहे. आकांक्षा म्हणाली की, “मला जैद हदीदला किस करताना खूप अनकंफर्टेबल वाटत होत.”

तसेच ती पुढे बोलताना म्हणाली की, “मला वाटल होत की त्याला समजेल की, मी एक भारतीय अभिनेत्री आहे. किस करणे एक टास्क होता. मी विचार करत होतो की, तो माझ्याकडे येईल आणि तो त्या संपूर्ण परिस्थितीबद्दल बोलेल. संवाद ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.” असे मत आकांक्षाने व्यक्त केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

दरम्यान, खरंतर अविनाशने आकांक्षा पुरी आणि जैद हदीद एक टास्क दिला होता. त्यानंतर जैद हदीद आणि आकांक्षा पुरी यांनी एकमेकांना किमान 30 सेकंद किस करताना दिसले. मात्र, टास्क करत असताना दोघेही एकमेकांना रोखू शकले नाहीत. किस करताना ते इतके तल्लीन झाले की, घरातील सर्व सदस्य आजूबाजूला आहेत हे ते दोघेही विसरुन गेले होते. हे सर्व पाहून घरातील बाकीच्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यावेळी मग पूजा भट्ट त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Akanksha Puri made a shocking revelation about the kissing scene with Zaid Hadid)

आधिक वाचा- 
– ‘गदर 2’च्या प्रॉडक्शन हाऊसबाबत अमीषा पटेलचा मोठा खुलासा, केले ‘हे’ गंभीर आरोप
‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ फेम अभिनेत्रीने अचानक सोडली चित्रपटसृष्टी, जाणून घ्या काय करतेय सध्या?

हे देखील वाचा