Thursday, April 18, 2024

‘पुणे टू गोवा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतोय आदित्यराजे मराठे, अभिनेत्याबद्दल ही गोष्ट तुम्हाला माहितीये का?

“पुणे टू गोवा” चित्रपटातून आदित्यराजे मराठे हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या अगोदर आदित्यराजे यानी “राउडी” आणि नुकताच प्रदर्शित झालेला “नादच एकचं फक्त बैलगाडा शर्यत” या चित्रपटात बहारदार अभिनयाने रसिकांची मने जिंकली होती. त्यानंतर आता तो मुख्य भूमिकेत “पुणे टू गोवा” या हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

या हिंदी चित्रपटाची निर्मिती मोरया प्रोडक्शन हाऊस ही संस्था करत आहे. हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स थ्रिलर, आणि ॲक्शन अशा संमिश्र जॉनरचा असणार आहे. याबाबत आदित्य म्हणाला की, ‘हा चित्रपट वास्तविक आयुष्यात संघर्ष करणाऱ्या कलाकारांच्या पुणे ते गोवा या प्रवासावर आधारित आहे. या कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या धोकादायक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.” ( Actor Adityaraje Marathe will make his debut in Bollywood with movie Pune to Goa )

सुनील पाल, एहसान कुरशी असे अनेक हिंदीतील कलाकार आदित्यराजे सोबत या चित्रपटात झळकणार आहेत. तसेच शाहिद मल्ल्या, जावेद अली, केतकी माटेगावकर अशा मराठी आणि बॉलिवूडमधील आघाडीच्या गायकांनी चित्रपटातील गीते गायली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत हे करत आहेत. सदरील चित्रपटाचे चित्रीकरण गोवा, पुणे या ठिकाणी पार पडले असून दुसऱ्या टप्प्यातील चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.

अधिक वाचा –
– “निळू फुल्याच्या नादाला लागू …”, किरण माने यांंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
– ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी घाला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुण्यातील खासदाराची केंद्राकडे मागणी

हे देखील वाचा