Thursday, April 18, 2024

“निळू फुल्याच्या नादाला लागू …”, किरण माने यांंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिनेते किरण माने यांनी अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. किरण माने यांनी अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकरल्या आहेत. ते अनेक मालिका आणि चित्रपटामध्ये झळकले आहेत. त्यांनी स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत काम केले आहे. तेव्हा पासुन ते खूप प्रसिद्धीच्या झोतात आले. या दरम्यान, त्या मालिकेत काम करताना त्यांचे आणि अनेक कलाकारांंचे वाद झाले होते. त्यामुळे त्यांना मालिकेतून अचानक काढण्यात आले.

किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. ते सोशल मीडियावरुन समाजातील घडामोडींबद्दल त्यांचं मत मांडताना दिसतात. किरण माने पोस्टद्वारे छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर किरण माने यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

किरण माने यांनी नुकतीच आज्जी विषयी एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “किरण, त्या अशोक सराफशी दोस्ती कर पण निळू फुल्याच्या नादाला लागू नगं..लै बेकार हाय त्यो…तस्ली संगत लै वंगाळ.” अस माझी आजी सांगायची. त्यांनी भली मोठी पोस्ट लिहिली आहे. किरण माने यांच्या या पोस्टवर खूप साऱ्या कमेंट येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “आपण खुप सुंदर लेख लिहिता सर आठवणी डोळ्यासमोर उभा राहतात. एखांद्या कादंबरी प्रमाणे ” दुसऱ्याने लिहिल की,”साहेब तुमचे अनुभव आपलेसे वाटतात…”. तर काही युजरने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. किरण माने नुकतेच ‘रावरंभा’ या चित्रपटातून ‘हकीमचाचा’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

अधिक वाचा-  
‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी घाला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुण्यातील खासदाराची केंद्राकडे मागणी
‘रांझणा’ फेम अभिनेता नमन जैन आता ‘असा’ दिसतो; पाहा फोटो

हे देखील वाचा