आदिपुरुष या चित्रपटात प्रभू श्री राम, हनुमान आणि रावण या तिघांनाही चुकीच्या पद्धतीने चित्रीत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यामुळे आदिपुरुष सिनेमावर देशभरात बंदी घालावी. निर्माता आणि कलाकारांवर कारवाई करण्याची मागणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
याबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना निवेदन दिले आहे. त्यात बारणे यांनी म्हटले आहे की, ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू अशा दोन भाषांमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. आदिपुरुष चित्रपटाची कथा, दृश्यांवर देश-विदेशात टीका होत आहे. भारतीय संस्कृतीची खिल्ली उडविली आहे. चित्रपटात अशोभनीय संवाद आहेत. सीता, हनुमान आणि रावण यांना चुकीच्या पद्धतीने चित्रीत केले आहे. यामुळे हिंदू समाजाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. ( adipurush movie should be banned cm eknath shinde MP shrirang barane demands )
हा चित्रपट देश-विदेशात प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून वादात सापडला आहे. आदिपुरुष या चित्रपटाला देशात विरोध होत आहे. या चित्रपटात अनेक अयोग्य आणि असभ्य संवाद वापरले गेले आहेत. त्यामुळे देशभरातून प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. भगवान हनुमानाचा अपमान करण्यात आला आहे. चित्रपटात श्री हनुमानाच्या व्यक्तिरेखेला अपमानास्पद संवाद देण्यात आले आहेत. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट रामायणावर आधारित असल्याचे वर्णन केले आहे. परंतु, त्यातील एकही पात्र आपल्या धर्माच्या नियमांनुसार नाही.
सनातन आस्था आणि सनातनप्रेमींचे हृदय दुखावणारे असे संवाद चित्रपटात आहेत. चित्रपटात दाखवण्यात आलेली सर्व पात्रे रामायणाच्या कथेच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. हा चित्रपट म्हणजे आपला इतिहास बदलण्याचे षडयंत्र आहे. हिंदू धर्मांची कथा पूर्णपणे चुकीच्या आणि अशोभनीय पद्धतीने दाखवणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटावर देशभरात बंदी घालावी. निर्माता, कलाकारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी खासदार बारणे यांनी निवेदनातून केली आहे.
अधिक वाचा –
– पेढे वाटा पेढे! ‘ही’ टीव्ही अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
– बाॅलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री आहेत योगो करण्यात एक्यपर्ट; तुम्हीही या टिप्स फॉलो करा