Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड रिलीजनंतर 13व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर राडा करतोय अजयचा ‘दृश्यम 2’, छापले तब्बल ‘एवढे’ कोटी

रिलीजनंतर 13व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर राडा करतोय अजयचा ‘दृश्यम 2’, छापले तब्बल ‘एवढे’ कोटी

काही सिनेमे असे असतात, जे रिलीज होतात आणि काही दिवसांमध्येच आपलं गाठोडं गुंडाळतात. मात्र, काही सिनेमे असेही असतात, जे एकदा का रिलीज झाले, तर ते दुसऱ्या आठवड्यातही आपल्या कमाईची जादू कायम ठेवतात. याच सिनेमांमध्ये सुपरस्टार अजय देवगण याच्या ‘दृश्यम 2’ या सिनेमाचाही समावेश होतो. अजयच्या या सिनेमाच्या कमाईच्या गतीने वेग धरला आहे. चांगल्या कहाणीच्या जोरावर हा सिनेमा चाहत्यांचा आवडता बनत आहे. दृश्यम 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन जबरदस्त आहे. 150 कोटी रुपयांचा गल्ला जमवणाऱ्या या सिनेमाने आता 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी पावले टाकली आहेत. अशात या सिनेमाच्या रिलीजनंतर 13व्या दिवशी किती कमाई केली आहे, जाणून घेऊया…

‘दृश्यम 2’ सिनेमाने 13व्या दिवशी किती कमावले?
‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा रिलीजच्या दोन आठवड्यानंतरही प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचत आहे. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळे अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याच्या सिनेमाची कमाई वेगाने वाढत आहे. अशात 13व्या दिवशी दृश्यम 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन (Drishyam 2 Box Office Collection) किती झाले? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात घोंगावत असेल, तर रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाने 13व्या दिवशी 4.50-4.90 कोटी रुपयांदरम्यान कमाई केली आहे. अशात हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

तब्बल 200 कोटी रुपयांसाठी ‘दृश्यम 2’ची झेप
रिलीजच्या 13व्या दिवशीही ‘दृश्यम 2’ सिनेमा जबरदस्त कमाई करत आहे. सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 160 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. अशात असे म्हटले जात आहे की, जर अशाप्रकारे येत्या वीकेंडपर्यंत हा सिनेमा अशीच कमाई करत राहिला, तर सिनेमा 200 कोटींचा आकडा सहजरीत्या पार करेल.

‘दृश्यम 2’बद्दल बोलायचं झाल्यास, सिनेमाने 200 कोटी रुपयांची कमाई केली, तर 200 कोटींचा गल्ला जमवणारा हा अजय देवगणच्या कारकीर्दीतील तिसरा सिनेमा असेल. अशात हा सिनेमा 200 कोटी रुपयांची कमाई करतो की, नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला नाना पाटेकरांवर होतं जीवापाड प्रेम, नव्वदच्या दशकात गाजवलेलं बॉलिवूड
रितेश देशमुखच्या नवीन सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांना लावतंय ‘वेड’, युट्यूबवर एकाच दिवसात केलाय राडा

हे देखील वाचा