Thursday, November 14, 2024
Home मराठी रितेश देशमुखच्या नवीन सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांना लावतंय ‘वेड’, युट्यूबवर एकाच दिवसात केलाय राडा

रितेश देशमुखच्या नवीन सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांना लावतंय ‘वेड’, युट्यूबवर एकाच दिवसात केलाय राडा

हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आता दिग्दर्शनात उतरला आहे. रितेश दिग्दर्शित करत असलेला ‘वेड‘ हा पहिला सिनेमा आहे. या मराठी सिनेमासाठी चाहत्यांच्या उत्सुकता आधीपासूनच वाढल्या होत्या. आता या सिनेमातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या ‘वेड’ चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यांच्या चित्रपटातील पहिले गीत ‘वेड तुझा’ (Ved Tujha) बुधवारी (दि. 30 नोव्हेंबर) प्रदर्शित झाले. हे गीत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिया शंकर (Jiya Shankar) यांच्यावर चित्रित झालेले आहे. अजय अतुलने संगीतबद्ध केलेले आणि अजय गोगावले यांच्या आवाजातील हे गाणं खरंच मंत्रमुग्ध करणारं आहे. या गाण्याला एकाच दिवसात युट्यूबवर 29 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनीला 10 वर्षे पूर्ण झाले आहेत. ‘वेड’ ही त्यांची सहावी चित्रपट निर्मिती आहे. मुंबई फिल्म कंपनीने आता ‘देश म्यूजिक’ हे म्युझिक लेबल लाँच केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
नादच खुळा! पुण्याच्या ‘गोल्डन बॉईज’ची बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री, एमसी स्टॅनशी होतेय तुलना?
जरा इकडे पाहा! साऊथ सुपरस्टारला 9 तास बसावे लागले ईडी ऑफिसात, चौकशीनंतर म्हणाला, ‘मी सर्वकाही…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा