Wednesday, March 27, 2024

फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला नाना पाटेकरांवर होतं जीवापाड प्रेम, नव्वदच्या दशकात गाजवलेलं बॉलिवूड

सोशल मीडियावर दररोज कलाकारांचे नवे- जुने फोटो व्हायरल होत असतात. त्यातील काही फोटो असेही असतात, जे पाहून पटकन तो कलाकार कोण आहे, हे ओळखता येत नाही. आताही बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. हा फोटो तिच्या लहानपणीचा आहे. हा फोटो पाहून अंदाज लावणे कठीण होत आहे की, ही अभिनेत्री कोण आहे? 

कोण आहे अभिनेत्री?
फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीने नव्वदच्या दशकात चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. ही मुलगी मोठी होऊन बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली. तिने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. मूळची नेपाळची असलेल्या या अभिनेत्रीने हिंदी सिनेमांव्यतिरिक्त नेपाळी, तमिळ, तेलुगू, मल्याळम सिनेमातही काम केले आहे. विशेष म्हणजे, तिने भरतनाट्यम आणि मणिपुरी नृत्याचे धडेही घेतले आहेत.Manisha-Koirala-Photo

तुम्ही अजूनही या मुलीला ओळखले नसेल, तर ही अभिनेत्री नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला (Manisha Koirala) ही आहे. हा फोटो मनीषाच्या बालपणीचा आहे. तिचा जन्म 16 ऑगस्ट, 1970 रोजी नेपाळच्या काठमांडू येथे झाला होता. तिच्या वडिलांचे नाव प्रकाश कोईराला आणि आईचे नाव सुषमा कोईराला आहे. तिचे वडील नेपाळमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. तसेच, मनीषा ही नेपाळचे माजी पंतप्रधान बिश्वेश्वर प्रसाद कोईराला यांची नात आहे.

मनीषाचे शिक्षण वाराणसीच्या वसंत कन्या महाविद्यालयातून झाले आहे. तिला लहानपणापासूनच डॉक्टर बनायचे होते. मात्र, ती मॉडेलिंग केल्यानंतर अभिनेत्री बनली. मनीषाने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. त्यात नाना पाटेकर (Nana Patekar) यांचाही समावेश आहे. असे म्हटले जाते की, सिनेमात काम करताना हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघेही एकमेकांची गाठभेट घ्यायचे. मात्र, नाना पाटेकर आधीपासूनच विवाहित होते आणि त्यांना मुलगाही होता. तसेच, ते वयाने मनीषापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. नाना मनीषाबद्दल खूपच पझेसिव्ह होते, पण ते लग्न करू शकत नव्हते. त्यावेळी त्यांचे अफेअर खूपच गाजले होते. त्यानंतर दोघांनीही आपल्या वेगळ्या वाटा निवडल्या. त्यानंतर मनीषाने नेपाळी व्यावसायिक सम्राट दहाल याच्यासोबत 19 जून, 2010रोजी संसार थाटला. हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यांनी 2012मध्ये घटस्फोट घेतला.

मनीषाचे हिट सिनेमे
मनीषाच्या हिट सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘मुंबई एक्सप्रेस’, ‘1942: ए लव्ह स्टोरी’, ‘इंसानियत के देवता’, ‘यल्गार’, ‘सौदागर’, ‘मिलन’, ‘दुश्मनी’, ‘अनोखा अंदाज’, ‘मन’, ‘जानी दुश्मन’ आणि ‘चॅम्पियन’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.(this little girl born in a royal family having an affair with nana patekar in 90s know about her)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
आनंदवार्ता! धर्मेंद्रचा नातू ‘या’ दिवशी अडकणार लग्न बंधनात, प्रेयसी द्रीशासोबत घेणार सात फेरे

रविवारी जलसाचे गेट चाहत्यांसाठी बंद, बिग बींनी चाहत्यांना दिला माेठा इशारा, जाणून घ्या कारण

हे देखील वाचा