Saturday, April 12, 2025
Home अन्य कोर्टाकडून एजाज खानचा जामीन रद्द; ड्रग्ज प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून जेलमध्ये आहे कैद

कोर्टाकडून एजाज खानचा जामीन रद्द; ड्रग्ज प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून जेलमध्ये आहे कैद

चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर एनसीबी नावाचे वादळ घोंगवायला लागले आहेत. सुशांतच्या मृत्यूची चौकशी करताना ड्रग्जचा संबंध समोर आल्यानंतर अनेक मोठमोठे कलाकार या जाळ्यात अडकले. याला टेलिव्हिजन इंडस्ट्री देखील अपवाद नाही. याच केसमध्ये मार्च २०२१ मध्ये टीव्ही क्षेत्रातील अभिनेता आणि बिग बॉस फेम एजाज खानला अटक करण्यात आली होती.

या अटकेनंतर एजाजने जामिनसाठी अर्ज दिला होता. आज या जामिनवर मुंबईच्या एसप्लांडे कोर्टात सुनावणी झाल्यानंतर, त्याचा जामीन अर्ज नाकारण्यात आला आहे. मागच्या तीन महिन्यांपासून एजाज जेलमध्ये कैद आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) एजाजच्या घरातून ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर त्याला अटक झाली.

मंगळवारी, ३० मार्च २०२१ रोजी एनसीबीने एजाजच्या मुंबईयेथील घरावर छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीत त्याच्या घरातून भारतात बॅन असलेले ड्रग्ज सापडले होते. त्यानंतर ३१ मार्च २०२१ रोजी एनसीबी कडून एजाजला अटक करण्यात आली.

एजाज जेव्हा राजस्थानमधून मुंबईत परत येत होता, तेव्हा मुंबई एयरपोर्टवरच त्याला अटक झाली. एनसीबीने सांगितले की, त्यांच्या टीमला एजाजकडून अल्प्राजोलम टॅबलेट मिळाल्या होत्या. या गोळ्यांवर भारतात बंदी आहे. एनसीबीच्या सांगण्यानुसार एजाज खान हा ड्रग पेडलर असणाऱ्या शादाब फारूक शेख उर्फ ​​शादाब बटाटा यांच्या गँगचा भाग होता. एजाजच्या अटके अगोदर एक आठवडा एनसीबीने शेखला अटक केले होते. एनसीबीने त्याच्याकडून दोन किलोपेक्षा अधिक मेफेड्रोन हे बॅन असलेले औषध जप्त केले होते.

शादाब बटाटाच्या चौकशी दरम्यान एनसीबीला एजाजचे नाव समजले. त्यावरूनच एजाजच्या घराची झडती घेतली गेली. मात्र एजाजने त्याच्या जबानीत सांगितले की, त्याने त्याच्यावरील हे आरोप अमान्य केले असून, त्याच्या घरी एनसीबीला फक्त झोपेच्या गोळ्या सापडल्या आहेत. त्याची बायको नैराश्याने ग्रस्त असून ती त्या गोळ्या घेत असल्याचे एजाजने सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा