Monday, July 1, 2024

अक्षय कुमार बनला भारतीय नागरिक; पुरावा देत म्हणाला, ‘हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही हिंदुस्तानी…’

आपल्या जबरदस्त अभिनयाने वर्षोनुवर्षे चाहत्यांचे मनोरंजन करणारा सुपरस्टार अक्षय कुमार याला नेहमीच त्याच्या नागरिकत्वामुळे ट्रोल केले जात होते. मात्र, आता अक्षयच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 15 ऑगस्ट रोजी 77वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी दिली आहे.

अक्षय कुमार इंस्टाग्राम पोस्ट
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने 77व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (77th Independence Day) चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. खरं तर, अक्षय कुमार याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व होते. आता अक्षय कुमार भारतीय नागरिकत्व (Akshay Kumar Indian Citizenship) मिळाल्याने भलताच खुश आहे. त्याने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. त्याने गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या प्रमाणपत्राचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने लिहिले की, “हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही हिंदुस्तानी. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.”

अभिनेत्याच्या या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एका युजरने लिहिले की, “शेवटी टीकाकारांची बोलती बंद झालीच.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “अक्षय कुमार जेव्हाही येतो, तेव्हा टीकाकार चिडू लागतात.” आणखी एकाने लिहिले की, “आमच्या हृदयात तू आधीपासूनच नागरिक बनला आहेस.” एकाने असेही लिहिले की, “तू तर आधीपासूनच भारतीय आहेस. हे तर फक्त एक प्रमाणपत्र आहे. तुझ्यासाठी वेगळाच सन्मान आहे.”

अभिनेत्याच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर तो सध्या ‘ओएमजी 2’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. अभिनेत्याच्या या सिनेमाने रिलीजच्या 4 दिवसांनंतर 50 कोटी रुपये कमावले आहेत. हा सिनेमा 2012 साली रिलीज झालेल्या ‘ओएमजी- ओह माय गॉड’ सिनेमाचा सीक्वल आहे. (superstar akshay kumar got indian citizenship actor shares post on happy independence day)

महत्त्वाच्या बातम्या-
‘इंडियन मिया खलिफा’ म्हणणाऱ्यांवर अभिनेत्रीची आगपाखड; म्हणाली, ‘त्यांनाही इज्जत…’
काजोल ते महेश बाबू, स्टार कलाकारांकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, ‘खिलाडी’ने भारतीय असल्याचा दिला पुरावा

हे देखील वाचा