छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध पण तितकाच वादग्रस्त असलेला ‘बिग बॉस‘ हा शो नेहमीच चर्चेत असतो. या शोमधील स्पर्धकही चर्चेचा विषय ठरतात. जेव्हा स्पर्धक शोमधून बाहेर पडतात, तेव्हा काहीजण चांगलीच प्रसिद्धी मिळवतात, तर काहीजण लाईमलाईटपासून दूर जातात. प्रसिद्धी मिळवणाऱ्या स्पर्धकांमध्ये निक्की तांबोळी हिच्या नावाचाही समावेश आहे. निक्की ‘बिग बॉस 14’ शोनंतर खूपच प्रसिद्ध झाली आहे. मागील काही वर्षांमध्ये जो चाहतावर्ग मिळवला आहे, त्यांना तिचा ‘हॉट गर्ल’ लूक खूपच आवडतो. एकीकडे तिला भरपूर प्रेम मिळत आहे, तर काहीजण तिला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोंवरून चाहत्यांनी तिला ट्रोल केले आणि हद्द पार करत तिला ‘इंंडियन मिया खलिफा’ही म्हटले.
अशात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना निक्कीने आपल्या फोटोंवर आलेल्या घाणेरड्या कमेंट्सबाबत भाष्य केले. तिने म्हटले की, “ते मला काहीही बोलू शकतात. मला याची पर्वा नाहीये. कारण, मला याने काहीच फरक पडत नाही.” घाणेरड्या कमेंट्सचा उल्लेख करत 26 वर्षीय निक्कीने खुलासा केला की, तिची किंवा इतर कुणाचीही तुलना कोणत्याही ऍडल्ट सिनेमातील कलाकाराशी करणे त्या महिलांचा अपमान आहे.
View this post on Instagram
‘ऍडल्ट स्टारही आदराच्या हक्कदार’
निक्की म्हणाली की, “माझी किंवा इतर कुणाचीही तुलना एका ऍडल्ट सिने स्टारशी करणे त्या महिलांचा अपमान आहे. कोणत्याही कारणाशिवाय एखाद्या महिलेला अपमानास्पद का केले जावे? हे तेच लोक नाहीत का जे त्यांच्या वासनाने भरलेल्या डोळ्यांनी अशाप्रकारचे ऍडल्ट सिनेमे पाहण्याचा आनंद घेतात? एक ऍडल्ट सिनेमाची स्टारही सन्मानाची हक्कदार आहे.”

निक्की तांबोळीने ट्रोलिंगविषयी भाष्य
निक्कीने पुढे बोलताना म्हटले की, ती अशाप्रकारची ट्रोलिंग मनावर घेत नाही. तसेच, तिला याचा फरकही पडत नाही. तिने खुलासा केला की, “तुम्ही जितके जास्त ट्रोलिंगवर लक्ष द्याल, तितकेच ते तुमच्यावर वैयक्तिक कमेंट करतील आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करतील.” निक्कीने असेही सांगितले की, त्यांना जाणीव होईल की, ही एकतर्फी बाब आहे, तेव्हा ते कमेंट करणे बंद करतील. शेवटी तिने असेही म्हटले की, हे ट्रोलर्स तिला तिचे शानदार आयुष्य जगण्यापासून रोखू शकत नाहीत.
निक्कीच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत अनेक सिनेमात काम केले आहे. त्यात ‘कंचना 3’, ‘जोगिरा सारा रा रा’, ‘टिकू वेड्स शेरू’ यांचा समावेश आहे. (actress nikki tamboli lashed out at those who called her porn stars)
महत्त्वाच्या बातम्या-
काजोल ते महेश बाबू, स्टार कलाकारांकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, ‘खिलाडी’ने भारतीय असल्याचा दिला पुरावा
भारीच ना! स्वातंत्र्यदिनी ‘Fighter’चा टीझर रिलीज, ऋतिक अन् दीपिकाचा दमदार लूक जगभरात व्हायरल