Wednesday, October 9, 2024
Home बॉलीवूड काजोल ते महेश बाबू, स्टार कलाकारांकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, ‘खिलाडी’ने भारतीय असल्याचा दिला पुरावा

काजोल ते महेश बाबू, स्टार कलाकारांकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, ‘खिलाडी’ने भारतीय असल्याचा दिला पुरावा

संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. देशाचा प्रत्येक नागरिक हा खास सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत आहे. अशात बॉलिवूड कलाकार कसे मागे राहतील. कलाकारांनाही 77वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा केला आहे. त्यांनी चाहत्यांना शुभेच्छा देत हा सण साजरा केला. यामध्ये ईशा देओल, सुनील ग्रोव्हर, हिमांशी खुराना, काजोल, प्रभास यांनी इंस्टाग्रामवर तिरंगा झेंड्याचा फोटो लावत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमारच्या हटके शुभेच्छा!
सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या ‘ओएमजी 2‘ (OMG 2) सिनेमामुळे चर्चेत आहे. अशात त्याने स्वातंत्र्यदिनाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने ट्वीट करत लिहिले की, “हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही भारतीय. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद.”

काजोलने बदलला प्रोफाईल फोटो
अभिनेत्री काजोल (Kajol) खास अंदाजात स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करत आहे. तिने आपला प्रोफाईल फोटोला तिरंगा झेंड्याचा फोटो लावला आहे. यासोबतच तिने एक व्हिडिओ शेअर करत शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

‘मी तिरंगा आहे’- अनुपम खेर
अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिहिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी तिरंगा आहे… मी विचार करतो की, जर कधी आपल्या तिरंग्याला नागरिकांसोबत आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली, तर तिरंगा आपल्याला काय म्हणेल? स्वातंत्र्यदिनाच्या खास क्षणी मी या व्हिडिओत आपल्या राष्ट्रीय ध्वजाकडून नागरिकांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा आणि शेअर करा. सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद! भारत माता की जय!”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

महेश बाबूनेही दिल्या शुभेच्छा!
यादीत साऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या नावाचाही समावेश आहे. महेश बाबूने ट्वीट करत लिहिले की, “आज आणि प्रत्येक दिवशी संयुक्त भारताची भावना साजरी करतो. 2023च्या स्वातंत्र्यदिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.”

करण जोहरने शेअर केला फोटो
सिने निर्माता करण जोहर सध्या त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाचे यश साजरे करत आहे. करणने 77व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चाहत्यांना शुभेच्छा देत भारतीय झेंड्याचा फोटो पोस्ट केला आहे.

Karan-Johar
Photo Courtesy Instagramkaranjohar

कंगनानेही खास अंदाजात दिल्या शुभेच्छा!
अभिनेत्री कंगना रणौत हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्वातंत्र्यदिनानिमित्त फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिने इंस्टा स्टोरीवर कॅप्शनमध्ये लिहिले की, “स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.”

Kangana-Ranaut
Photo Courtesy Instagramkanganaranaut

अशाप्रकारे अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (77th independence day 2023 anupam kher to mahesh babu these celebs celebrating 15 august by wishing fans)

महत्त्वाच्या बातम्या-
भारीच ना! स्वातंत्र्यदिनी ‘Fighter’चा टीझर रिलीज, ऋतिक अन् दीपिकाचा दमदार लूक जगभरात व्हायरल
तारीख आली रे! ‘या’ खास सणादिवशी रिलीज होणार ‘The Vaccine War’ सिनेमा, टीजरही पाहिला का?

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा