सध्या संपूर्ण देशात दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. अशा स्थितीत चित्रपटसृष्टी मागे कशी राहणार?दिवाळी सणानिमित्त मनोरंजन क्षेत्रातील सर्व अभिनेते चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता अक्षय कुमार यानेही दिवाळीनिमित्त व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडिओ साेशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल हाेत आहे आणि चाहते यावर विविध प्रितिक्रिया देत आहे.
अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेता सण आणि भक्तीच्या रंगात रंगलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता पारंपारिक पद्धतीने देवाची आरती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने सर्व देशवासियांना दिव्यांचा सण दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले,”दिवे, रंग आणि त्याहूनही गोड हसू. माझा वर्षातील सर्वोत्तम दिवस. माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.” समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये, अभिनेता कुर्ता पायजमा परिधान केलेल्या पारंपारिक लूकमध्ये अतिशय छान दिसत आहे. त्याचबरोबर यावेळी उपस्थित अनेकजण अभिनेत्याने आयोजित केलेल्या या आरतीमध्ये देवाची पूजा करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
अक्षयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘राम सेतू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट उद्या म्हणजेच 25 ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा यांसारखे कलाकारही दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अनुपमा नाहीतर उर्फीच ठीक, अभिनेत्रीचा टाॅपलेस व्हिडिओ पाहून भडकला वनराज
अर्रर्र! काहीतरी बिनसलं! करीनाच्या दिवाळी पार्टीत आलिया अन् रणबीर गैरहजर