Thursday, July 18, 2024

दिग्दर्शक इंद्र कुमार यांचा थेटट्रोलर्सलाच प्रश्न; ‘अक्षय कुमार पॅन्टशर्ट घालून क्रिष्णाची भूमिका करु शकतो मग चित्रगुप्त…’

हिंदी चित्रपट इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता इंद्र कुमार यांनी इंडस्ट्रीमध्ये ‘दिल’, ‘बेटा’, ‘राजा’, आणि ‘इश्क’ सारखे दमदार चित्रपट देऊन त्यांनी आपला पाय रोवला आहे. त्यांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडणारे चित्रपट देऊन आज आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अमाप प्रसिद्धी मिळवणारे दिग्दर्शक आज चित्रपटामधील केलेल्या एका चुकीमुळे वादाच्या घेऱ्यात अडकले आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता इंद्र कुमार यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘थैंक गॉड’ हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) याच्या भुमिकेमुळे चांगलाच वाद पेटला आहे. करण त्याने चित्रपगुप्तची भूमिका साकारत असताना सुट घातला आहे, त्यामुळे प्रेक्षक चित्रपटावर संताप व्यक्त करत आहेत. इंद्र कुमार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाबद्दल वक्तव्य होते, तेव्हा त्यांनी सगळ्यांनाच एक प्रश्न विचारला आहे जे ऐकूण प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडला आहे.

वृत्तपत्रातील माहितीनुसार इंद्र कुमार (Indra Kumar) यांनी फाइव्ह स्टारमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये इंद्र कुमार यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केल आहे. मात्र, त्यांनी ‘थॅंक गॉड’ चित्रपटाबद्दल झालेल्या चुकीमुळे प्रेक्षकांची क्षमा मागितली आणि नंतर त्यांनाच विचार करण्यासारखा एक प्रश्न विचारला आणि आपल्या चित्रपटाची सविस्तर माहिती सांगितली. प्रत्येक भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिले तेव्हा त्यांनी अजयच्या भूमिकेबद्दलही स्पष्ट केले की, “जेव्हा आम्ही हा चित्रपट बनवला तेव्हा खरच मला माहित नव्हते की, चित्रपगुप्त देव कोणत्या श्रेणीमध्ये येतात मात्र, आता माहित झाले की, काही समाजातील लोक यांना मानतात. मी मानत आहे की, आमच्याकडून चुकी झाली आणि आम्ही याला सुधरवण्यासाठी देखिल तयार आहेत, पण माझा एक प्रश्न आहे की, एकाच गोष्टीसाठी सोशल मीडियावर या लोकांचे वेगवेगळे विचार कसे काय असू शकतात? जर अक्षय कुमारला चित्रपट ओ माय गॉड मध्ये लोकांनी पॅन्ट शर्टमध्ये कृषण देवाची भूमिकेत स्वीकारु शकतात तर मग माझ्या चित्रपटामध्ये अजय देवगनला चित्रगुप्तच्या भूमिकेत सुट घालण्यावर एवढा का गोंधळ चालु आहे.”

त्यांनी आपल्या दमदार वक्तव्याने सोशल मीडियावरील ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना सेडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या चित्रपटाची बाजू न घेता हे बरोबर आहे की, नाही असा प्रश्न थेट प्रेक्षकांवर सोपवला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चित्रपटात रोमँटिक सीन देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे यश चोप्रा होते ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडे
कर्जबाजारी झालेल्या अमिताभ यांना यश चोप्रांच्या ‘मोहब्बते’ने दिला होता मदतीचा हात

हे देखील वाचा