Friday, July 12, 2024

अर्रर्र! काहीतरी बिनसलं! करीनाच्या दिवाळी पार्टीत आलिया अन् रणबीर गैरहजर

सध्या दिवाळीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. बॉलिवूडमध्ये दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ अनेक स्टार्सनी दिवाळीपूर्वीचे आयोजन केले. शनिवारी(दि. 22 ऑक्टाेबर)ला जिथे एकता कपूर ते आनंद पंडित त्यांच्या दिवाळी पार्टीमुळे चर्चेत राहिले, तर त्याच दरम्यान, रविवारी(दि. 23 ऑक्टाेबर)ला करीना कपूरनेही तिच्या घरी कुटुंबीयांसह एक भव्य पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत तिचे संपूर्ण कपूर कुटुंब सामील झाले हाेते. ज्याचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

व्हिडिओमध्ये कपूर कुटुंब एकापाठोपाठ एक करीना (kareena kapoor) हिच्या घरी पाेहचताना दिसत आहे. बेबोची मावशी रीमा जैन (Rima Jain) पतीसोबत करीनाच्या घरी पोहोचली. त्याचवेळी, सैफ अली खान (Saif Ali Khan) याची बहीण अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) पती कुणालसोबत करीना-सैफच्या कौटुंबिक दिवाळी पार्टीत सहभागी होताना दिसली. करिश्मा कपूर, रणधीर कपूर, बबिता कपूर, आंटी नीतू कपूरही या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. मात्र, अद्याप पार्टीमधील काेणतेही फाेटाे समाेर आलेले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

या दिवाळी पार्टीमध्ये करिश्मा अगदी सिंपल लूकमध्ये पोहोचली. त्यावेळी तिने फिकट गुलाबी रंगाचा शरारा परिधान केलेला दिसला. तर दुसरीकडे, नीतू कपूरने या खास प्रसंगी गडद निळ्या आणि लाल रंगाचा सूट परिधान केला हाेता, ज्यामध्ये त्या खूप सुंदर दिसत हाेत्या. मात्र, या पार्टीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दिसले नाहीत. करीना कपूरचे वडील रणधीर कपूर यांनी खुलासा केला की, “कपूर कुटुंब 23 ऑक्टोबरला दिवाळीपूर्वीचे सेलिब्रेशन करणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

तरीदेखील, कपूर कुटुंबाने हा उत्सव लहान प्रमाणात साजरा केला, ज्यामध्ये फक्त आणि फक्त कपूर कुटुंबातील लोकच सहभागी झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बाबाे! शिव ठाकरे अन् शालीन भानोत यांच्यात जाेरदार भांडण, पाहा व्हायरल व्हिडिओ
जगावेगळंच! मल्लिका लवकर झोपते म्हणून बॉयफ्रेंडला असते ‘ही’ तक्रार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

हे देखील वाचा