साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला हिंदी प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चाहत्यांना अल्लू अर्जुनला बॉलिवूड चित्रपटांमध्येही पाहण्याची इच्छा आहे. अनेक चाहत्यांनी अभिनेत्याला हिंदी चित्रपटात येण्यास सांगितले होते. त्याचवेळी, आता या सगळ्यामध्ये अल्लू अर्जुनने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची भेट घेतली आहे. या प्रसंगाचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
अल्लू अर्जुन काल रात्री मुंबईत संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला. पाहताच क्षणी पॅपराझींनी त्याला घेरले. अल्लू अर्जुन यावेळी अतिशय कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसला. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती. पण तो नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत होता. अल्लू अर्जुनला संजय लीला भन्साळीच्या ऑफिस बाहेर पाहिल्यानंतर, दोघे एका प्रोजेक्टवर एकत्र काम करू शकतात अशी अटकळ पसरली आहे.
अल्लू अर्जुनचा संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिस बाहेरचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. आता सर्वजण व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि अल्लू अर्जुनला त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल विचारत आहेत.
अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरात या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटात रश्मिका मंदान्ना दिसली होती. या चित्रपटाच्या कथेसोबतच गाणी, डायलॉग आणि काही अभिनयाच्या चालीही खूप गाजल्या आहेत.
याशिवाय अल्लूच्या ‘पुष्पा द राइज’ चित्रपटातील गाण्यांबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री समंथा प्रभूने ‘ओ अंटावा’ गाण्यावर परफॉर्म केला. या गाण्यातील अभिनेत्रीच्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांना वेड लावले. हे या चित्रपटाचे हिट गाणे आहे. या गाण्याच्या माध्यमातून समंथा पहिल्यांदाच आयटम नंबर करताना दिसली आहे. त्यासाठी तिने मोठी रक्कमही घेतली होती.
अल्लू अर्जुनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्याने २०११ मध्ये स्नेहा रेड्डीसोबत लग्न केले. दोघांना २ मुले आहेत. मुलाचे नाव अयान आणि मुलीचे नाव अरहा असून, अल्लू आणि अरहा लवकरच ‘शकुंतलम’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. अल्लू आणि त्याची मुलगी पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे.
अल्लू देखील वयाच्या दुसऱ्या वर्षी पहिल्यांदा पडद्यावर दिसला. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विजेता’ या चित्रपटात तो दिसला होता. त्याचवेळी त्याने २००१ मध्ये ’डॅडी’ चित्रपटात कॅमिओ केला आणि त्यानंतर २००३ मध्ये ‘गंगोत्री’ चित्रपटात पदार्पण केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –