Monday, June 24, 2024

केबीसीच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा! हजार भागांची पूर्ती, अमिताभ म्हणाले, ‘खेळ अजून संपला नाही…’

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोचा प्रत्येक सीझन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. या शोमध्ये विचारलेल्या प्रश्नांबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक असतात. प्रेक्षक स्वतःला या शोसोबत इतके जोडले गेले आहेत की, घरी बसूनही ते प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. सध्या टीव्हीवर केबीसीचा १३ वा सीझन सुरू आहे. हे पर्व तुफान गाजत असून टिआरपीच्या यादीतही टॉपवर आहे. यादरम्यान शोचे १००० एपिसोड्सही पूर्ण होणार आहेत.

या खास भागासाठी शोमध्ये बच्चन कुटुंब हजेरी लावणार आहेत. ‘कौन बनेगा करोडपती १३’ च्या सेटवर हे कुटुंब थिरकताना देखील दिसणार आहे. या आठवड्यात अमिताभ यांच्यासोबत त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा कार्यक्रमात सहभागी होणार आहे. केबीसीच्या १००० व्या एपिसोडमध्ये श्वेता आणि नव्या नवेली खास पाहुण्या म्हणून येणार असून, यादरम्यान श्वेताने तिच्या वडिलांना अमिताभ बच्चन यांना केबीसीच्या प्रवासाबाबत प्रश्न केला, त्यानंतर अमिताभ भावुक देखील झाले.

या भागाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये श्वेता तिच्या वडिलांना विचारते की, हा तुमचा एक हजारावा भाग आहे, तुम्हाला कसे वाटत आहे? यावर अमिताभ म्हणतात की, “असे वाटते की, जणू संपूर्ण जगच बदलले.” यानंतर शोच्या पहिल्या एपिसोडपासून आतापर्यंत एक सुंदर व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये पहिला एक कोटी विजेता, पहिला पाच कोटी विजेता, पहिला कोट्याधीश महिला, पहिला सात कोटी विजेता असे सर्व जिंकणारे स्पर्धक दाखवले गेले. या व्हिडिओमध्ये हा १३ वर्षांचा संपूर्ण काळ, हा प्रवास एका मिनिटाच्या एव्हीमध्ये दाखवला गेला. हा व्हिडिओ पाहून उपस्थित सर्व लोकं भावूक झाले होते. अमिताभ देखील चश्मा काढून डोळे पुसत म्हणतात, “चला खेळाला पुढे घेऊन जाऊया, कारण खेळ अजून संपलेला नाही.”

यापूर्वी अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर श्वेता आणि नव्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्यांनी त्यांच्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव केला होता. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रिय मुलगी (श्वेता).” अमिताभ यांचा हा फोटो चाहत्यांना आवडला असून, आता बच्चन कुटुंबातील तीन पिढ्यांना एकत्र पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा