Saturday, April 20, 2024

अभिनेते अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भुमिकेत! पण जितेंद्र आव्हाड म्हणतायेत, ‘…मी विरोध करणार’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि मराठी अभिनेते अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (Why I Killed Gandhi) या चित्रपटावरुन वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहे. ‘Why I Killed Gandhi‘ या चित्रपटात अभिनेते अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. (Ncp MP Actor Amol kolhe In The Role Of Nathuram Godse)

अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी संबंधित चित्रपटात नथूराम गोडसेचे पात्र साकारल्याचे समजतात, सोशल मीडियावर त्यावरुन प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. अगोदरच वादातीत असलेल्या नथूराम गोडसेचे व्यक्तिमत्व पडद्यावर साकारणारे अमोल कोल्हे, त्यांच्याच राजकीय पक्षातील सहकाऱ्यांकडूनच टार्गेट केले जात असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अमोल कोल्हे यांच्या चित्रपटातील भुमिकेला विरोध केला आहे. आणि त्याबाबत एक पोस्ट देखील केलेली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वतःची भुमिका मांडली आहे. ज्यात त्यांनी विरोध करण्याचे सकारण दिले आहे.

हेही वाचा – खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भुमिकेत! WHY I KILLED GANDHI चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अमोल कोल्हे यांच्या ‘Why I Killed Gandhi‘ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याबद्दल बोलताना अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका अगोदरच स्पष्ट केली. ज्यात त्यांनी, ‘आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले चित्रिकरण झाले होते’ असे म्हटले आहे.

(Why I Killed Gandhi Movie Actor Amol kolhe In Role Of Nathuram Godse Jitendra Awhad Opposing)

चित्रपटाच्या प्रोमोत नेमकं काय?

चित्रपटाच्या प्रसिद्ध झालेल्या प्रोमोत नथूराम गोडसेच्या भुमिकेत असलेले अमोल कोल्हे काही वाक्य बोलताना दिसत आहेत. “नव्याने बनलेल्या पाकिस्तानमध्ये हिंदू धर्म आणि संस्कृती नामशेष करण्यासाठी जे हिंदूवर अत्याचार केले जात आहेत त्याचं मूळ कारण महात्मा गांधी हे आहेत.’ मी महात्मा गांधींची हत्या केली. त्या कार्यक्रमाची स्वातंत्र्यवीर सावरकरांना जराशीही कल्पना नव्हती. अमानुषपणे झालेल्या भारत विभाजनामध्ये दीड कोटीपेक्षा अधिक लोक बेघर झाले आणि लाखो नागरिकांनी आपला जीव गमावला” असं वाक्य अमोल कोल्हे बोलताना व्हिडिओत दिसत आहेत.

पाहा प्रोमो –

वाद वाढणार की मिटणार?

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “एक कलाकार या नात्याने त्यांनी (अमोल कोल्हे) भूमिका नाकारायला हवी होती. ज्या नराधमाने महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या त्या माणसाचा अभिनय करणे मला मान्य नाही” असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे ज्याप्रकारे आव्हाड यांनी ही भुमिका घेतलीये, ते पाहता हा वाद मिटणार की चिघळणार आणि चित्रपटावर त्याचा काय परिणाम होणार हे पाहावे लागेल.

अधिक वाचा –

हे देखील वाचा