Sunday, June 23, 2024

धक्कादायक! ‘बिग बॉस 13’ Paras Chhabraने सिक्स पॅक ऍब्जसाठी घेतले होते स्टेरॉईड? अभिनेत्याचा खुलासा

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध पण तितकाच वादग्रस्त असलेल्या ‘बिग बॉस‘ या शोमध्ये बरेच कलाकार आले आणि गेले. काही कलाकार बाहेर पडताच स्टार झाले, तर काहींना प्रसिद्धी सांभाळता आली नाही. ‘बिग बॉस 13’ शोचा भाग राहिलेल्या पारस छाब्रा यानेही तुफान प्रसिद्धी मिळवली. पारस हा अलीकडे त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत असतो. मागील काही महिन्यांपासून स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तो कसून मेहनत घेत आहे. त्याने फिटनेस मिळवली देखील. मात्र, काही कारणांमुळे त्याचे वजन खूपच वाढले होते, पण तो पुन्हा आपल्या जुन्या शेपमध्ये परतला आहे.

एवढेच नाही, तर अभिनेता आणि मॉडेल पारस छाब्रा (Paras Chhabra) याने सिक्स पॅक ऍब्जही बनवले आहेत. अशात एका मुलाखतीत अभिनेत्याने 6 किंवा 8 पॅक ऍब्ज ठेवण्याच्या कल्पनेविषयी आपले स्पष्ट मत मांडले. चला तर, तो काय म्हणालाय जाणून घेऊयात…

स्टेरॉईड घेणे जोखीम
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, “हे आरोग्यदायी नाहीये. एक तर तुम्ही स्टेरॉईड घेत आहात, जसे मी माझ्या आयुष्यातील एका टप्प्यावर घेतले होते. मात्र, सर्वात वाईट बाब अशी की, याचा प्रभाव काही वेळातच संपतो. मी विचार केला की, ही जोखीम माझ्यासाठी योग्य नाहीये. एक वेळ होती, जेव्हा मी फक्त सैल कपडे घालायचो. मात्र, आता मी पुन्हा पांढरा टी-शर्ट परिधान करत आहे. मी माझी आवडती प्रत्येक गोष्ट खात आहे आणि पीत आहे. फक्त गोष्ट एवढीच आहे की, माझा ट्रेनर माझा आहार आणि माझ्या जीवनशैलीनुसार वर्कआऊट करवून घेत आहे. मी वास्तवात आता स्वत:वर लक्ष केंद्रित करत आहे.”

पारस करत होता चिंतेचा सामना
खरं तर, मागील काही वर्षे अभिनेत्यासाठी खूपच आव्हानात्मक राहिले आहेत. कारण, तो चिंतेचा (Anxiety) सामना करत आहे. आपल्या मानसिक आरोग्याविषयी बोलताना पारस म्हणाला होता की, “दीर्घ काळानंतर मला मानसिकरीत्या निरोगी वाटत आहे. आता चिंतेचा सामना करण्यासाठी मी एका चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. ज्यावेळी मी एका डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितले की, मी जे काही सहन करत होतो, ते सामान्य होते. ते माझ्या व्यावसायिक आयुष्यामुळे होते. आम्हा अभिनेत्याचा कोणताही नित्यक्रम नसतो. नेहमी, दोन प्रोजेक्टमध्ये अंतर असू शकते. माझ्या बाबतीत हे अंतर जरा जास्तच होते.”

पारसच्या मालिका
पारसने आतापर्यंत अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्यात ‘स्प्लिट्सव्हिला’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘विघ्नहर्ता गणेशा’, ‘कर्ण संगिनी’, ‘बढो बहू’ आणि ‘कलीरें’ यांचा समावेश होता. (actor and model paras chhabra revealed taking steroids for six pack abs in a point of life)

महत्त्वाच्या बातम्या-
करण कुंद्रासोबतच्या नात्यावर स्पष्टच बोलली अभिनेत्री; म्हणाली, ‘माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता…’
‘महिला वॉशिंग मशीन आहेत का आणि पुरुषांना…?’, कंगनाच्या वक्तव्याने खळबळ, लगेच वाचा

हे देखील वाचा