Saturday, September 30, 2023

करण कुंद्रासोबतच्या नात्यावर स्पष्टच बोलली अभिनेत्री; म्हणाली, ‘माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता…’

‘नागिन’, ‘स्वरागिनी’, ‘रिश्ता लिखेंगे हम नया’ यांसारख्या हिंदी मालिका तसेच ‘मन कस्तुरी रे’ या मराठी सिनेमात काम करून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश होय. ‘बिग बॉस 15‘ शोचा भाग बनल्यानंतर अभिनेत्री घराघरात पोहोचली. अशात तेजस्वी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. यावेळी ती तिच्या नात्याविषयी केलेल्या विधानामुळे चर्चेत आली आहे.

‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) शोमध्येच तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) यांची भेट झाली होती. या शोदरम्यान त्यांच्यात प्रेम फुलले होते. आज ही जोडी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट जोडप्यांपैकी एक आहे. या जोडीवर चाहते जीव ओवाळून टाकतात. अलीकडेच करण कुंद्रा याच्यासोबत आपल्या नात्याविषयी अभिनेत्रीने मोकळेपणाने चर्चा केली आहे.

काय म्हणाली तेजस्वी?
एका संकेतस्थळाशी बोलताना तेजस्वी म्हणाली की, “हे माझे पहिले नाते आहे, जे मी सार्वजनिक केले आहे. हे माझे असे पहिले नाते आहे, ज्यात इंडस्ट्रीचा कोणी व्यक्ती आहे. मी कोण आहे किंवा कोणाला डेट करत आहे, हे लोकांना कळावे, असे मला कधीच महत्त्वाचे वाटले नाही.”

पुढे बोलताना अभिनेत्री म्हणाली की, तिला जर पर्याय दिला असता, तर तिने तिचे रिलेशनशिप खासगी ठेवले असते. तिने सांगितले की, “जर तिला पर्याय दिला गेला असता, तर तिला आपले नाते खासगी ठेवायला आवडले असते. मात्र, मला हे नाते सार्वजनिक करण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता. प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर जर कोणता पर्याय दिल, तरीही मी माझे नाते खासगी ठेवणेच पसंत करेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचे एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होत असतात. चाहत्यांनी या जोडीला ‘तेजरन’ असे नावही दिले आहे. तसेच, त्यांच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओची चाहत्यांना आतुरता असते. अभिनेत्रीच्या सोशल मीडियावरील चाहत्यावर्गाविषयी बोलायचं झालं, तर तिला इंस्टाग्रामवर 7.2 मिलियन म्हणजेच 72 लाख लोक फॉलो करतात. कदाचित त्यामुळेच अभिनेत्रीचा फोटो किंवा व्हिडिओ शेअर होताच व्हायरल होऊन जातो. (actress tejasswi prakash on dating karan kundrra she preferred keep her relationship private)

महत्त्वाच्या बातम्या-
‘महिला वॉशिंग मशीन आहेत का आणि पुरुषांना…?’, कंगनाच्या वक्तव्याने खळबळ, लगेच वाचा
ठरलं रे! ‘या’ चित्रपटात दिसणार सीमा-सचिनची लव्हस्टोरी; एकदा वाचाच

हे देखील वाचा