भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर) कार अपघात झाला. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्या मर्सिडीज बेंझ ही महागडी गाडी अपघातात जळून खाक झाली. या अपघातानंतर पंतला मोठी दुखापत झालीये आणि तो डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. अशात बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूर आणि अनुपम खेर हे रिषभ पंत याच्या तब्येतीविषयी चौकशी करण्यासाठी शनिवारी (दि. 31 डिसेंबर) हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
रिषभ पंतला भेटण्यासाठी पोहोचले अनिल कपूर आणि अनुपम खेर
सध्या देशभरातून रिषभ पंत (Rishabh Pant) लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. बॉलिवूड कलाकारांनीही पंतसाठी प्रार्थना केली आहे. अशात माध्यमांतील वृत्तानुसार, बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अनुपम खेर (Anupam Kher) शनिवारी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी पंतची भेट घेऊन त्याच्या तब्येतीविषयी विचारपूस केली.
यादरम्यान अनिल आणि अनुपम यांनी पंतच्या आईशीही चर्चा केली. त्यांनी म्हटले की, “आम्ही लोकांना हे आवाहन करतो की, त्यांनी पंत लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करावी. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.”
Uttarakhand | Actors Anil Kapoor & Anupam Kher arrived at Max Hospital in Dehradun to meet Cricketer Rishabh Pant, who is admitted there following an accident yesterday
"We met him & his mother. He is stable. Appeal to people to pray for him so that he gets well soon," they say pic.twitter.com/wuaSCr3b68
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 31, 2022
Anil Kapoor and Anupam Kher went to the hospital to meet Rishabh Pant.@AnilKapoor @AnupamPKher #RishabhPantCarAccident pic.twitter.com/FSPUGEQlnA
— Subhankar Das (@Suvhu0854) December 31, 2022
कसा झाला होता अपघात?
शुक्रवारी सकाळी 5.30 वाजता पंत त्याच्या आईला भेटण्यासाठी दिल्लीहून उत्तराखंडला जात होता. अचानक त्याला डुलकी लागली आणि त्याची भरधाव गाडी दुभाजकाला जाऊन धडकली. त्यामुळे त्याच्या गाडीने पेट घेतला. अपघात झाल्यानंतर मागेच असणाऱ्या बसचालकाने पंतला गाडीतून बाहेर काढले. माध्यमांतील वृत्तांनुसार, बस चालकाने पंतला चादरने गुंडाळले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या बस चालकावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अनिल कपूर आणि अनुपम खेर यांचे सिनेमे
अनिल कपूर शेवटचे ‘जुग जुग जिओ’ या सिनेमात झळकले होते. त्यांच्या खात्यात ‘तख्त’, ‘फायटर’ यांसारखे सिनेमे आहेत. याव्यतिरिक्त अनुपम खेर यांच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ते शेवटचे ‘कनेक्ट’ या सिनेमात दिसले होते. या सिनेमात नयनतारा, सत्यराज या कलाकारांचाही समावेश होता. (actor anil kapoor anupam kher visit hospital for meet rishabh pant after car accident)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ 5 दिग्गजांनी 2022मध्ये कायमची एक्झिट घेत चाहत्यांना केले पोरके, यादीत लता दीदींचाही समावेश
कुणाच्या चालण्यावर कमेंट, तर कुणाला म्हटले ‘गोल्ड डिगर’, पण कलाकारांनीही ट्रोलर्सला शिकवला चांगलाच धडा