Saturday, April 20, 2024

कुणाच्या चालण्यावर कमेंट, तर कुणाला म्हटले ‘गोल्ड डिगर’, पण कलाकारांनीही ट्रोलर्सला शिकवला चांगलाच धडा

कलाविश्वातील प्रत्येक कलाकाराला यशाच्या पायऱ्या चढताना अनेक अपयश, ट्रोलिंग आणि टीका यांसारख्या गोष्टींचा सामना करावाच लागतो. यादरम्यानच त्यांच्या शानदार कामगिरीसाठी चाहते या कलाकारांना डोक्यावरही घेतात. मात्र, जेव्हा त्यांच्याकडून छोटीशी चूक जरी झाली, तर हेच चाहते कलाकारांना ट्रोल केल्याशिवाय राहत नाहीत. काही कलाकार ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात, पण काही कलाकार असे असतात, जे या ट्रोलर्सला धडा शिकवल्याशिवाय राहत नाहीत. अशात आपण 2022मध्ये ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या 5 कलाकारांविषयी जाणून घेऊयात.

सन 2022मध्ये ट्रोलर्सची बोलती बंद करणारे 5 कलाकार
सबा आजाद
संगीतकार आणि अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) ही 2022मध्ये ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याच्यासोबतच्या अफेअरमुळे चांगलीच चर्चेत आहे. सबाने ऋतिकसोबत ऋचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या समारंभात एन्ट्री केली होती. त्यांच्या अंदाजावर कमेंट करून एकीने लिहिले की, “तू छी, ईव, यक दिसत आहेस, जे काही समजते, ते समज.”

यानंतर ट्रोलरच्या या वादग्रस्त कमेंटवर सबाने सडेतोड प्रत्युत्तर देत म्हटले की, “जर तुला आवडत नाही, तर अनफॉलो कर.” सबाने युजरच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट शेअर करत तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले की, “ही श्रुती आहे. नक्कीच ती स्वत:शी प्रेम करते. मात्र, ती तिचा द्वेष शेअर करण्यासाठी मला फॉलो करते. तिच्यासारखे अनेक लोक आहेत. श्रुतीसारखे बनू नका. मला अनफॉलो करण्यासाठी तुम्ही पूर्णत: आझाद आहात. योगायोगाने श्रुतीला आतापर्यंत ब्लॉक केले नाही, पण तिला हे लवकरच कळेल.”

Saba-Azad-Story
Photo Courtesy: Instagram/sabazad

सुश्मिता सेन
अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) हिचादेखील या यादीत समावेश होतो. 2022 या वर्षात ललित मोदी यांनी सुष्मितासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच, तिच्यासोबत नात्यात असल्याचा दावा केला होता. मात्र, सुष्मिताने यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यानंतर तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका ट्रोलरला चांगलेच फटकारले होते. तिला एकाने ‘गोल्ड डिगर’ म्हटले होते. त्यानंतर अभिनेत्रीने एक लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “मी गोल्ड डिगर आहे, त्यांना हे माहिती नाहीये की, मी नेहमीपासूनच हिऱ्यांना प्राथमिकता दिली आहे आणि होय आजही मला स्वत:ला विकत घेणे आवडते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका अरोरा
अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याच्यासोबतच्या नात्यामुळे अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिने सर्वांचे लक्ष वेधले आहे. याव्यतिरिक्त ती तिच्या ‘विचित्र चाली’मुळेही चर्चेचा विषय ठरत असते. नुकतेच मलायकाने ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या तिच्या शोमध्ये त्या गोष्टींबद्दल चर्चा केली. तिने ट्रोलर्सची बोलती बंद करत म्हटले की, “तुम्ही जे काही करता, त्याबद्दल लोक चर्चा करतात, मी तुटून जाते, ही ब्रेकिंग न्यूज आहे. मी आयुष्यात पुढे जाते. मी माझ्या पार्टनरसोबत असते, तेव्हा मला ट्रोल केले जात आहे. मी चालते, तेव्हाही ट्रोल होते. हद्दच झाली यार.”

समंथा रुथ प्रभू
जेव्हापासून समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने पती नागा चैतन्य (Naga Chaitanya) याला घटस्फोट दिला. त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. समंथाने सोशल मीडियावर तिच्या पाळीव प्राण्यांचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो तिच्या वर्कआऊट सेशनदरम्यान घेण्यात आला होता. एका सोशल मीडिया युजरने कमेंट केली होती की, “ती तिच्या मांजरी आणि कुत्र्यांसोबत एकटीच मरणार आहे.” या ट्रोलरला धडा शिकवत अभिनेत्रीने टाळ्या वाजवत कमेंट केली की, “मी स्वत:ला भाग्यवान समजते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

आर माधवन
अभिनेता आर माधवन (R Madhavan) हा इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. तो कधीतरीच त्याचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. अभिनेत्याने एका फुटबॉल कार्यक्रमातून रणवीर सिंग याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. फोटोत माधवन आणि रणवीर एकमेकांची गळाभेट घेताना दिसत होते. एका ट्विटर युजरने या फोटोवर कमेंट करत लिहिले होते की, “आता मी तुम्हाला अनफॉलो करत आहे.” यावर माधवनने लगेच प्रत्युत्तर दिले की, “याची गरज आहे भावा. मी हे करेल.”

अशाप्रकारे, फक्त अभिनेत्रीच नाही, तर आर माधवनसारख्या अभिनेत्यानेही नेटकऱ्यांची टीका खपवून घेतली नाही. (sushmita sen to samantha ruth prabhu this actors shut down social media trolls)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! प्रसिद्ध अभिनेत्री 6 महिन्यांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, ‘दु:खद आहे…’
मृत्यूच्या 6 दिवसांनंतर तुनिषाचा कॅटरिनासोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल, सर्वत्र रंगलीय एकच चर्चा

हे देखील वाचा