Thursday, September 28, 2023

ही दोस्ती तुटायची नाय! मैत्रीदिनी अनुपम खेर सतीश कौशीक यांच्या आठवणीत भावूक; म्हणाले…

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे म्हटल की आपल्याला आपल्या सर्वात जवळच्या मित्राची किंवा मैत्रिणीची आठवण येते. मग ती छोटी असो किंवा मोठी. पण आपल्या सारखेच बाॅलिवूड कलाकारांना  मित्र असतील का असा प्रश्न  तुम्हाला ही पडतो ना. तर याच उत्तर आहे. हो. त्यांना देखील खुप सारे मित्र असतात. आज रविवारी (6 ऑगस्ट) सगळीकडे फ्रेंडशिप डे साजरा करत आहे. अशातच बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या मित्रांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अनुपम खेर यांनी सोशल मीडीयावर फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी दिवंगत मित्र सतीश कौशीक यांचा देखाल फोटो शेअर केला आहे.  अनुपम खेर (anupam kher )यांनी सतीश कौशीक  ( satish kaushik) यांच्या आठवणीत इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोंमध्ये अनिल कपूर आणि सतीश कौशिक आहेत.
या फोटोत अनुपम खेर, अनिल आणि सतीश हे तिघेही कॅमेऱ्याकडे पाहून हसत होते.  फोटो शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिले की, “हॅप्पी फ्रेंडशिप डे! आज सतीशला जरा जास्तच मिस करत आहे!” अनुपम खेरच्या या पोस्टवर सोशल मीडीया युजर्सनी कमेंट करत सतीश , अनुपम ,अनिल यांच्या मैत्रीचं कौतुक केलंय.

असा एकही दिवस नाही, तेव्हा अनुपमला सतीशची आठवण येत नाही. ज्येष्ठ अभिनेते-चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सतीश कौशीक यांच्या निधनानंतर, असा कोणताही दिवस जात नाही की खेर यांना त्यांचा प्रिय मित्र सतीशची आठवण येत नाही. अनुपम अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतीश यांचे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करतात. (actor anupam kher emotional post on satish kaushik friendship day)

हे देखील वाचा