Wednesday, December 6, 2023

‘डीडीएलजे’ सारख्या चित्रपटात काम करणारे अनुपम खेर यांचीही लव्हस्टोरी होती जरा हटकेच…

अभिनय क्षेत्रात प्रेम प्रकरण आणि ब्रेकअप यामध्ये काही विशेष नाही. मात्र, असेही काही जोडपे आहेत ज्यांच्या प्रेमाने आणि नात्याने लाेकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. लोक आजही त्यांच्या जोडीला आवडीने स्विकारतात. अशाच जोडप्यांपैकी एक दिग्गज अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) आणि किरण खेर (Kirron Kher) यांची जाेडी. चला तर आज म्हणजेच मंगळवारी (दि.7 मार्च)राेजी अनुपम यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्याची लव्हस्टाेरी…

दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये छाप सोडली आहे. ते जेवढे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात तेवढेच सुंदर त्यांचे वैयक्तीक आयुष्यासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. अनुपम यांनी जेवढ्या रोमांटिक चित्रपटामध्ये काम केले आहे तेवढीच रोमांटिक यांची लव्ह स्टोरी आहे. यांचे प्रेम मैत्री पासून ते प्रेमापर्यंत विश्वासाच्या पायावर आजही टिकलेले असून किरण आणि अनुपम खेर यांच्या लग्नाला 37 वर्ष पुर्ण झाले आहेत.

अभिनेत्री किरण खेर या 1980 साली चित्रपटाच्या कामासाठी मुंबईमध्ये आल्या होत्या. त्यांना कामासोबतच एक चांगला जोडीदारही लाभला. किरण यांनी उद्येगपती गौतम बैरी यांना काही दिवसांपर्यत डेट केले होते. यानंतर त्या दोघांनी लग्नही केले होते. या लग्नापासून किरणला एक मुलगा म्हणजेच सिकंदर याला जन्म दिला. यांची जोडी एक आदर्श जोड्यांपैकी एक होती. मात्र, काही वर्षनंतर यांच्या नात्यामध्ये वाद सुरु झाले होते. किरण चंढीगढमध्ये थेटर शिकत असताान त्यांची अनुपम खेर यांच्यासोबत चांगलीच मैत्री झाली होती, पण तेव्हा त्यांचे नाते फक्त मैत्रीपुरतेच होते. मात्र, यांचे नाते मैत्रीपेक्षाही जास्त चांगले कधी झाले ते त्यांनाही समजले नाही. किरण आपल्या लग्नामध्ये सुरु असलेल्या सगळ्या अडचनी अनुपम यांच्याशी वाटत होती. इकडे अनुपम हे देखिल आपल्या लग्नाला वैतागलेले होते. त्यांनाही लग्नबंधनातून सुटका हवी होती.

एरदा त्यांच्या थेटरच्या कार्यक्रमासाठी ते कोलकत्ताला गेले होते , तेव्हा त्यांच्या मानात किरण विषयी प्रेम जाणवले होते. एका मुलाखतीदरम्यान किरण खेर यांनी एक किस्सा सांगितला होता की, “एका नाटकासाठी त्याने केस कापले होते, तेव्हा तो खूपच वेगळा दिसत होता. मला जेव्हा खोलीपर्यत सोडवायला आला होता तेव्हा तो चालता चालता थांबला आणि त्याने माला मागे वळून पाहिले होते तेव्हा मला खूप वेगळेपण जाणवले होते. आम्हा दोघांनाही काही तरी झाल्यासारखं रकोेोनप्िरजपपहायला गेलं तर आधी अनुपम यांनीच आधी प्रपोज केले होते. एकदा ते किरण खेर यांच्या घरी गेले होते. त्यांना सांगितले होते की मला काहीतरी बोलायचे आहे. तेव्हा किरण यांनी दरवाजा खोलला की, अनुपम यांनी सांगितले की, “माला असे वाटत आहे की, मी तुझ्यावर प्रेम करत आहे.” मग त्यांना समजले की, एवढ्या वर्षाच्या मैत्रीमध्ये कुठेना कुठे प्रेम लपलेलं होतं.

यानंतर किरण यांनी आपल्या पूर्व पतीला घटस्फोट दिला आणि अनुपम यांनीही आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. मग काही दिवसांनी अनुपम आणि किरण यांनी विवाह केला. कारण यांच्या पूर्व पतीचा मुलगा याला अनुप यांनी आपले नाव दिले. हे खूप कमी लोकांना माहित आहे की, अनुपन आणि किरण यांचे स्वत:चे मुल नाही. त्यांनी सिकंदरलाच आपले नाव देऊन आपला मुलगा मानले आहे. यांच्या जोडीला 37 वर्ष लोटली आहेत, पण तरीही आज एकत्र आहेत.(love story kirron kher and anupam kher first meeting to marriage know story of the evergreen bollywood couple read here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आपल्या अशा वक्तव्यामुळे ‘या’कलाकारांनाही करावा लागला होता ट्रोलिंगचा सामना, एकदा पहाच यादी
ब्रेकिंग! बाॅलिवूडला हादरा! प्रख्यात अभिनेते अरूण बाली काळाच्या पडद्याआड

हे देखील वाचा