Friday, March 31, 2023

एयरपोर्टवर महिलेच्या ‘या’ कृत्यानं अरुण गाेविल झाले अस्वस्थ, व्हिडिओ पाहूण तुम्ही व्हाल थक्क

आपण जे काही पाहतो, त्याची प्रतिमा आपल्या हृदयात आणि मनात तयार होते. मग काहीही केल्या ते बदलू शकत नाही. असेच काहीसे अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांच्यासोबत घडले. 90च्या दशकात जेव्हा रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका टीव्हीवर प्रसारित झाली तेव्हा लोक घरोघरी मोठ्या श्रद्धेने पाहत होते कारण पहिल्यांदाच अशी पौराणिक मालिका प्रसारित झाली होती. 

रामायण मालिका इतकी प्रेक्षकांच्या पंसतीस उतरली की, आजही चाहते त्यांची एक झलक दिसली तर आपल्या भावना दर्शवायला मागेपुढे पाहत नाहीत. अरुण गाेविल(Arun Govil)यांचा असाच एक व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. व्हिडिओमध्ये अभित्याला पाहूण एक महिला चप्पल काढते आणि लगेच नतमस्तक हाेऊन नमस्कार करते.

अरुण गोविल यांच्या पायापडली महिला
महिला अरुण गाेविलला बघूण इतकी भावुक हाेते की, त्या पहिले हात जाेडून नमस्कार करतात आणि मग नतमस्तक हाेऊन नमस्कार करतात. यानंतर अभिनेता त्यांना एक अंगवस्त्र देताे. सुरुवातील तर त्या घेत नाही मात्र, नंतर त्यांना भेट म्हणून दिल्याने त्या हात जाेडून त्यांचे अभिवादन करतात.

अरुण गाेविलचा व्हिडिओ तुफान व्हायरल
अभिनेत्रीचा हा व्हिडिओ समाेर आल्यानंतर चाहत्यांने यावर प्रतिक्रिया देणं सुरु केलं आहे. एकाने लिहिले, “हा मुद्दा नाही की, अरुण गोविलला मिळणाऱ्या मानाचा एक टक्काही आजच्या कलाकारांना मिळेल का? मुद्दा असा आहे की, ते आदराने काही करत आहे का? नाही… ते फक्त पैशासाठी करत आहेत.”

अरुण गाेविलचा व्हिडिओवर लाेकांची दिली प्रतिक्रिया
एका चाहत्याने लिहिले, “अरुण गोविल आणि नितीश भारद्वाज यांनी श्री राम आणि श्री कृष्णाची भूमिका इतकी छान साकारली आहे की, ते इतर कोणत्याही भूमिकेत दिसत नाहीत. आजही राम आणि कृष्णाचा उल्लेख केला तर फक्त त्यांचा चेहरा समाेर येतो.” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, “त्यांना पाहून मीही त्यांच्यासारखीच प्रतिक्रिया दिली असती.”

अरुण गाेविल झाले अस्वस्थ
अरुण गोविलचा हा व्हिडीओ पाहून स्पष्टपणे दिसून येत आहे की, महिलेच्या या वागण्याने ते अस्वस्थ झाले हाेते. कारण त्यांना स्वत: आपल्या कोणत्याही प्रिय व्यक्तीने असे आपल्या पाया पडावे असे वाटत नाही. रामायण 35 वर्षांपूर्वी 1897 मध्ये प्रसारित झाले होते. आज अरुण गोविल यांचे वय ६४ वर्षे आहे. याचा अर्थ लोकांच्या नजरेत त्या पौराणिक कार्यक्रमाची त्यावेळची प्रतिमा अजूनही स्थिर आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुम्ही चिरंजीवी आणि रामसाठी माझे प्रेम विकत घेऊ शकत नाही’, पैसे ऑफर करणाऱ्या निर्मात्यावर भडकला सलमान

चाहत्यांच्या लवकरच भेटीस येताेय ‘ट्रिपलिंग सीझन 3’, हा फॅमीली ड्रामा बघून तुम्हीही होणार लोटपोट

हे देखील वाचा