Thursday, April 25, 2024

चाहत्यांच्या लवकरच भेटीस येताेय ‘ट्रिपलिंग सीझन 3’, हा फॅमीली ड्रामा बघून तुम्हीही होणार लोटपोट

‘द व्हायरल फिव्हर’ (TVF) निर्मित ‘ट्रिपलिंग‘ (Tripling) वेब सीरिजचे 2 सीझन रिलीज झाले आहेत. या मालिकेच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या मालिकेचे दोन्ही सीझन खूप गाजले आहेत. इतकंच नाही तर या मालिकेतील डायलॉग आणि अनेक दृश्यांनी मीम्सच्या रूपात सोशल मीडियावरही अधिराज्य गाजवले आहे. या मालिकेत चित्रित केलेलं एक गाणे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते. आता या वेब सीरीजचा तिसरा सीझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

टीवीएफ (TVF) आणि जी5 ओरिजिनल्स (G5 Originals)च्या मालिकेचा तिसरा सीझन तयार झाला आहे. मालिकेचा मुख्य अभिनेता सुमित व्यास(Sumeet vyas)याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. या मालिकेचे पोस्टर पोस्ट करताना सुमित व्यासने लिहिले की, “आम्‍ही तुम्‍हाला प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करायला लावली आहे. ‘ट्रिपलिंग’ वेब सीरीजचा तिसरा सीझन लवकरच येत आहे.” तीन वर्षांनी ट्रिपलिंग मालिकेचा नवा सीझन येत आहे. मात्र, त्याच्या रिलीज डेटबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

या सीरीजचे 2 सीझन आधीच आले आहेत. आता त्याचा तिसरा सीझन येणार आहे. याआधी आलेल्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. ही मालिका तरुणांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली हाेती. या मालिकेतील तीन प्रमुख पात्र भावंडे आहेत. तिघांच्या नात्यातील मतभेद आणि कुटुंबातील संघर्षाची ही कहाणी खूपच रंजक होती. या मालिकेतील एक गाणेही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. आता या मालिकेच्या तिसऱ्या सीझनसाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. मालिकेचे दिग्दर्शक उधवानी यांनी सांगितले की, या सीझनमध्ये तिघांच्या कुटुंबावर एक कथा तयार करण्यात आली आहे. या सीझनमध्ये चंदन, चंचल आणि चितवन यांचे कुटुंब आणि आई-वडीलही चांगल्या भूमिकेत दिसणार आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumeet Vyas (@sumeetvyas)

या मालिकेत सुमित व्यास, मानवी गाग्रू आणि अमोल पाराशर दिसणार आहेत. सुमित व्यासने शेअर केलेल्या या पोस्टरवर चाहते लाईक आणि कमेंटसचा भरभरुन वर्षाव करीत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भांडं फुटलं रे! अनन्या की रश्मिका, कुणाला डेट करतोय विजय देवरकोंडा? करण जोहरने स्पष्टच सांगितलं

राडाच! खरोखरची बंदूक चालवून ‘रॉकी भाई’ने दाखवला जलवा, व्हिडिओ पाहून चाहत्याला आठवली ‘केजीएफ’ची ‘कलाशनिकाव’

हे देखील वाचा