टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून आनंदाची बातमी समोर येत आहे. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू जोडपे नोव्हेंबर महिन्यात आई-वडील बनले होते. आता त्यांचा मित्र आणि अभिनेता अयान खान याच्या घरातही बुधवारी (दि. 21 नोव्हेंबर) चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. अयाजची पत्नी जन्नत हिने मुलीला जन्म दिला आहे. या जोडप्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली. विशेष म्हणजे, त्यांनी बाळाची झलकही दाखवली आहे.
अभिनेता अयाज खान याने त्याच्या मुलीचा फोटो शेअर करत पहिली झलक दाखवली आहे. या फोटोत चिमुकलीने आई-वडिलांची बोटे पकडली आहेत. हा फोटो खूपच सुंदर आहे. अभिनेत्याने फोटोला कॅप्शन देत लिहिले आहे की, “दुआ खरी होते!! 21:12:22 रोजी, परमेश्वराने आम्हाला आमच्या लहान मुली दुआ हुसेन खानच्या आगमनाने आशीर्वाद दिला.” या पोस्टमधून अभिनेत्याने मुलीचे नावही सांगितले आहे. आता या पोस्टवर चाहते आणि कलाकार कमेंट्स करत अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री सागरिका घाटगे हिने लव्ह इमोजी पोस्ट केले आहेत. तसेच, अभिनेत्री नीलम कोठारी हिने कमेंट करत लिहिले की, “ओह माय गॉड अभिनंदन.” अभिनेत्री किश्वर मर्चंट हिने लिहिले की, “खूप छान नाव. तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन.” याव्यतिरिक्त एका चाहत्याने लिहिले की, “देव तिला आशीर्वाद देवो.” दुसऱ्या एकाने असे लिहिले की, “किती छान नाव आहे. तुमचे खूप खूप अभिनंदन.”
अयाजच्या मुलीचे नाव
अयाज आणि जन्नत यांना लग्नाच्या 5 वर्षांनंतर बाळ झाले आहे. अयाजने पोस्टमधून त्याच्या मुलीचे नावही जाहीर केले आहे. त्याने मुलीचे नाव ‘दुआ’ असे ठेवले आहे. त्याने असेही सांगितले आहे की, तो आणि त्याच्या पत्नीने मिळून हे नाव ठेवले आहे. तो म्हणाला की, “माझ्या आयुष्यात जन्नत आहे. त्यामुळे आमच्या मुलीसाठी यापेक्षा चांगले नाव दुआच असू शकते.”
दुसरीकडे करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) आणि बिपाशा बासू (Bipasha Basu) यांनी त्यांच्या मुलीचे नाव ‘देवी’ (Devi) असे ठेवले होते.
अयाजच्या मालिका
अयाज हा सध्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, त्याने अनेक सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तो ‘ब्लफमास्टर’, ‘दिल मिल गए’, ‘जाने तू या ना जाने’, ‘भूत भूत ना रहा’, ‘परिचय’, ‘चश्मे बद्दूर’ यांसारख्या सिनेमा आणि मालिकांचा समावेश आहे. (actor ayaz khan blessed with baby girl)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
व्हिडिओ: सिनेमाच्या प्रमोशनला गेला अन् चप्पल खाऊन आला ‘हा’ अभिनेता, घटना कॅमेऱ्यात कैद
शाहरुख अन् दीपिकाचा नवा धमाका, सिद्धार्थ आनंदने उघड केले ‘पठाण’च्या दुसऱ्या गाण्याचे रहस्य