Tuesday, January 31, 2023

व्हिडिओ: सिनेमाच्या प्रमोशनला गेला अन् चप्पल खाऊन आला ‘हा’ अभिनेता, घटना कॅमेऱ्यात कैद

सोशल मीडियावर नेहमीच कलाकारांचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ असे असतात, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कुणीतरी कन्नड अभिनेता दर्शन याच्यावर चप्पल फेकल्याचे दिसत आहे. या कृत्यानंतर अभिनेत्यासोबतच त्याचे चाहतेही हैराण झाले. अशात चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही लोकांनी अभिनेत्याचा विरोधही केला आहे, पण असे कशामुळे घडले? चला जाणून घेऊया…

गर्दीमध्ये केले गैरवर्तन
खरं तर, कन्नड अभिनेता दर्शन (Darshan) हा एका कार्यक्रमात सामील झाला होता. कर्नाटकच्या होसपेटमध्ये आयोजित केल्या गेलेल्या या कार्यक्रमात तो त्याच्या ‘क्रांती’ या आगामी सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचला होता. यादरम्यान दर्शनने बोलायला सुरुवात करण्यासाठी स्टेजवर चढताच, गर्दीतून कुणीतरी त्याच्या दिशेने चप्पल फेकली. ती चप्पल थेट अभिनेत्याच्या खांद्याला जाऊन लागली. या घटनेने अभिनेता एकदम हैराण झाला. तसेच, तिथे उपस्थित सर्वांना धक्का बसला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली.

दर्शनचे वादग्रस्त वक्तव्य
अभिनेता दर्शनवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावत काही लोकांनी सोशल मीडियावर त्याचा जोरदार विरोध केला आहे. खरं तर, असे म्हटले जात आहे की, त्याच्यावर आरोप आहे की, दर्शनने एका हिंदू देवीशी निगडीत वादग्रस्त वक्तव्य करत अपमान केला आहे. त्याचे हे वक्तव्य महिलांचा अपमान आणि धार्मिक भावना दुखावणारे म्हटले जात आहे. दर्शनच्या वक्तव्याचा विरोध करत सोशल मीडियावर अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे.

दर्शनचे सिनेमे
दर्शनने अनेक सिनेमात काम केले आहे. त्यामध्ये ‘कारिया’, ‘सारथी’, ‘गजा’, ‘संगोली रायन्ना’, ‘जग्गू दादा’, ‘ओडेया’, ‘चक्रवर्ती’, ‘मिस्टर ऐरावता’, ‘कुरुक्षेत्र’, ‘क्रांती’, ‘यजमना’, ‘रॉबर्ट’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. (kannada actor darshan hit with a slipper during an event see video here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुख अन् दीपिकाचा नवा धमाका, सिद्धार्थ आनंदने उघड केले ‘पठाण’च्या दुसऱ्या गाण्याचे रहस्य
पळा पळा! पतीसोबत असताना नयनताराला चाहत्यांनी घेरले, गर्दीतून धावतानाचा अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा