Saturday, June 29, 2024

आयुष्मानने शाहरुखच्या बंगल्याकडे पाहून मागितली ‘मन्नत’, चाहते म्हणाले, ‘स्वत:ला कमी लेखू नको…’

स्वप्ननगरी मुंबईत पोहोचणाऱ्या प्रत्येक बॉलिवूड चाहत्यांना कलाकारांच्या आलिशान घरांचे आकर्षण असते. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांचे घर पाहण्यासाठी चाहते मुंबईला आवर्जून भेट देतात. कदाचित या सर्वांमध्ये चाहत्यांना सुपरस्टार शाहरुख खानचा बंगला ‘मन्नत’ याचे आकर्षण सर्वाधिक असते. त्यामुळेच चाहते शाहरुखच्या बंगल्याच्या बाहेर गर्दी करतात आणि सेल्फी तसेच फोटोही काढतात. हे फोटो काढून चाहते एक आठवण आपल्याजवळ ठेवतात. कदाचित यापूर्वी कोणत्याही अभिनेत्याला दुसऱ्या एखाद्या कलाकाराच्या घराबाहेर चाहत्यांच्या गर्दीत पाहिले नसेल. मात्र, बॉलिवूडचा एक कलाकार शाहरुखच्या ‘मन्नत’च्या बाहेर चाहत्यांच्या गर्दीत दिसत आहे.

शाहरुख खानच्या घराबाहेरील गर्दीत दिसला आयुष्मान खुराना
शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या ‘मन्नत’ (Mannat) बंगल्याच्या बाहेर चाहत्यांच्या गर्दीत आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हादेखील दिसत आहे. त्याने स्वत: त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो गर्दीमध्ये दिसत आहे. मात्र, त्याचे लक्ष हे ‘मन्नत’वर आहे. या फोटोतील गर्दीसाठी आयुष्मान हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आणि चाहते ‘मन्नत’सोडून आयुष्मानला पाहण्यात व्यस्त झाले.

हेही वाचा- सुपरबोल्ड ईशा गुप्ता लग्नाला तयार! मुलामध्ये पाहिजेत फक्त ‘हे’ गुण, तुमच्यात आहेत का?

‘मन्नतजवळून जाताना एक नवस मागितला’
आयुष्मानने हा फोटो शेअर करत लिहिले की, “मन्नतजवळून जात होतो, तेव्हा एक नवस मागितला.” यासोबत त्याने #AnActionHero #2ndDecember #SRKian असे हॅशटॅग्जही जोडले आहेत. आयुष्मानच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील मित्रमंडळी आणि चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत. अभिनेत्री झारा खान हिने लिहिले की, “देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो.” जितेंद्र कुमार याने लिहिले की, “मुंबईतील आवडती जागा.” मात्र, त्याच्या या पोस्टवर काही युजर्सनी त्यांची वेगळी मतं मांडली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

युजर काय म्हणाले?
एका युजरने लिहिले की, ‘ज्यांना लोक बॉयकॉट करत आहेत, त्यांच्याकडे नवस काय मागायचा?’ दुसऱ्या एकाने लिहिले की, “स्वत:ला कमी लेखू नको, तूदेखील त्या दर्जाचा म्हणजे त्याच्यापेक्षा चांगला अभिनेता आहेस. तू गायनही करतो.” आणखी एकाने लिहिले की, “भावा तू शाहरुखच्या घरी येऊन त्याची जागा घेतली आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्मानच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘ऍन ऍक्शन हिरो’ या सिनेमात झळकणार आहे. त्याचा हा सिनेमा येत्या 2 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
कोट्यवधी रुपयांची कार गिफ्ट करणाऱ्या निर्मात्याच्या वाढदिवशी बेभान होऊन नाचला कार्तिक, पाहा व्हिडिओ
भल्याभल्यांना मागे टाकत 8 वर्षीय गुंजन बनली ‘झलक दिखला जा 10’ची विनर, जिंकले ‘एवढ्या’ लाखांचे बक्षीस

हे देखील वाचा