Friday, May 24, 2024

नाद करा पण आमचा कुठं! शाहरुखने ‘मन्नत’च्या प्रवेशद्वारावर लावली ‘डायमंड’ नेमप्लेट

बॉलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता शाहरुख खान याचा चाहता वर्ग खूप माेठा आहे. 2 नाेव्हेंबरला जेव्हा अभिनेत्याने त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला, तेव्हा दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही त्याच्या घराबाहेर चाहत्यांची खूप माेठी गर्दी जमली हाेती. अशातच आता किंग खानने मन्नतच्या मुख्य गेटचे डिझाईन बदलल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच नेम प्लेटमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, शाहरुखच्या नवीन नेम प्लेटमध्ये हिरे जडले आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

शाहरुख खान (shah rukh khan) याचे चाहते अनेकदा त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर उभे राहून फोटो क्लिक करतात. अशातच आता त्याच्या घराच्या बाहरील डिजाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. मन्नतच्या गेटला दोन्ही बाजूने नवीन नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. ज्यात हिरे बसवण्यात आले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मन्नतची नेम प्लेटही रात्रीच्या अंधारात ताऱ्यांसारखी चमकताना दिसत आहे.

शाहरुखचे चाहते नव्या नेम प्लेटसोबत फोटोशूट करत आहेत. एका फॅन क्लबने शेअर केलेल्या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे, “मन्नतच्या नवीन गेटचे दृश्य. हे भेटवस्तूसारखे आहे.” त्याचवेळी दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “दोन महिन्यांनी मन्नतच्या नवीन गेटचे डिझाइन समोर आले आहे. तुम्ही काय विचार करत आहात?” अशाप्रकारे फोटोंवर युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे. शाहरुखकडे अनेक चित्रपट आहेत. शाहरुखचा ‘पठाण’ पुढील वर्षी जानेवारीत रिलीज होणार आहे. याशिवाय शाहरुख खान ‘जवान’मध्येही दिसणार आहे. सलमान खानच्या ‘टायगर 3’मध्ये शाहरुखचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. (Bollywood actor shah rukh khan house mannat new diamond studded name plate srk home changed look video viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! एव्हलिन शर्माने वाढदिवसानिमित्त एका वर्षानंतर दाखवला लेकीचा चेहेरा

‘टीनाला दाखवावं लागेल तिचं स्टेटस’, सुंबूल-शालीनच्या नात्यावर ‘इमली’च्या वडिलांचं मोठं वक्तव्य

हे देखील वाचा