सुपरबोल्ड ईशा गुप्ता लग्नाला तयार; मुलामध्ये पाहिजेत फक्त ‘हे’ गुण, तुमच्यात आहेत का?


बॉलिवूडमध्ये अनेक हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहेत. त्यामध्ये समावेश होतो, ते म्हणजे अभिनेत्री ईशा गुप्ताचा. ईशा बोल्ड ड्रेस आणि हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ईशा सध्या मॅन्युएल कॅम्पोस ग्वालरला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या स्पॅनिश बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण तुम्हाला माहित आहे का? की, ईशा लग्नासाठी कोणत्या प्रकारचा मुलगा शोधत आहे. ईशाची एक मुलाखत सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने सांगितले की, तिला कोणते गुण असलेल्या मुलाशी लग्न करायचे आहे.

‘मी खूप खाजगी व्यक्ती आहे
माध्यमांतील वृत्तांनुसार, ईशाने (Esha Gupta) तिच्या निद्रिस्त आयुष्याबद्दल आणि तिचे नाव कोणाशीही जोडल्याच्या अफवेबद्दल सांगितले. ईशा म्हणाली की, “मी किती वेळ घालवते हे लोकांना फक्त माहीत आहे आणि त्यांना वाटते की, त्यांना खूप काही माहित आहे. पण मी कुटुंब आणि मित्रांच्या बाबतीत खूप खासगी व्यक्ती आहे. लोक माझ्याबद्दल खूप लिहितात, पण या गोष्टींनी मला काही फरक पडत नाही.”

ईशाला वाटते ‘याची’ काळजी
अभिनेत्री म्हणते की, “जेव्हा पुरुषांच्या लग्नाचा विषय असतो, तेव्हा त्यांना खूप कमी प्रश्न विचारले जातात. या गोष्टीचे खूप वाईट वाटते. मात्र, महिलांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू असते. माझ्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर जाण्यापूर्वी मला योग्य वेळेची वाट पाहायची आहे.”

‘मला बदलण्याचा प्रयत्न करू नये’
जोडीदाराच्या गुणांबद्दल बोलताना ईशा म्हणाली की, “माझ्या कुटुंबात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. येथे पालकांनी आपल्या मुलींना स्वतंत्र ठेवावे. जर मी श्रीमंत मुलाशी लग्न केले आणि तो मला नंतर सोडून गेला, तर मला पोटगी घेऊन आयुष्य जगायचे नाही. मला स्वतःसाठी काहीतरी करायचे आहे. मला माझे आडनाव बदलायचे नाही. मला असा जोडीदार हवा आहे, जो मला साथ देईल आणि मला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही.”

ईशाने २००७ मध्ये ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’चा किताब जिंकला होता. २०१२ मध्ये ईशा गुप्ताने ‘जन्नत २’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ईशासोबत इमरान हाश्मी दिसला होता. ‘जन्नत २’ नंतर ईशा गुप्ता २०१२ मध्येच इमरान हाश्मीसोबत ‘राज ३’ चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!