चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी कोणत्याही कलाकाराला सुंदर आणि आकर्षक दिसणे गरजेचे आहे, असे नेहमी म्हटले जाते. पण हे विधान चुकीचे सिद्ध केले ते हिंदी सिनेमाचे प्रसिद्ध अभिनेते भगवान दादा यांनी. भलेही भगवान दादा देखणे किंवा तरुण नव्हते, तरी ते विनोदाचे राजे म्हणून ओळखले जातात. आयुष्यात बऱ्याच अडचणी असूनही, आनंदी राहणारे असे ते व्यक्तिमत्त्व होते. पडद्यावर प्रेक्षकांना हसवणाऱ्या भगवान दादांनी 4 फेब्रुवारीला मात्र सर्वांना रडवले. त्यांनी 4 फेब्रुवारी 2020 रोजी जगाला निरोप दिला.
एक श्रमिक म्हणून करायचे काम
भगवान दादांचा जन्म 1 ऑगस्ट 1913 रोजी महाराष्ट्रातील मुंबईत झाला. ते आपल्या ‘अलबेला’ चित्रपट आणि ‘शोला जो भडके’ या गाण्यासाठी ओळखले जातात. सुरुवातीच्या काळात भगवान दादा मजूर म्हणून काम करायचे. परंतु तेव्हा देखील ते चित्रपटाची स्वप्ने पाहायचे. त्यांना मूक चित्रपटामध्ये ब्रेक मिळाला. त्यानंतर ते पूर्णपणे स्टुडिओमध्ये सामील झाले. भगवान दादांनी ‘क्रिमिनल’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जो एक मुकपट होता. सन 1938 मध्ये त्यांनी ललिता पवार यांच्यासोबत ‘बहादूर किसान’ या चित्रपटाचे सहदिग्दर्शन केले होते. सन 1938 पासून ते 1949 पर्यंत त्यांनी कमी बजेटच्या स्टंट आणि ॲक्शन चित्रपटांचे दिग्दर्शन केले जे कामगार वर्गामध्ये अतिशय लोकप्रिय होते.
जेव्हा एका अभिनेत्रीला मारली होती चापट
एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान दादांनी आपली सह अभिनेत्री ललिता पवार यांना चापट मारली होती. त्यांनी चुकून अभिनेत्रीला जोरात चापट मारल्यामुळे तिच्या डाव्या डोळ्याची एक शीर फाटली होती. त्यासाठी 3 वर्ष त्यांच्यावर उपचार होत राहिले पण तरीही त्यांचा डोळा बरा होऊ शकला नाही.
त्यांचा हा चित्रपट ठरला सुपरहिट
अभिनयाबरोबरच भगवान दादांनी चित्रपट निर्मितीही सुरू केली. 1951 साली त्यांनी थोड्या पैशातून आणि काही मित्रांसोबत मिळून ‘अलबेला’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यानंतर पैशांचा जणू त्यांच्यावर पाऊस पडायला लागला. त्यानंतर दादांनी जुहूजवळ बरेच बंगले व मोठमोठ्या गाड्या घेतल्या.
वाईट व्यसनाने उध्वस्त होऊ लागले जीवन
जास्त पैसे मिळाल्यानंतर त्यांना वाईट व्यसन लागले आणि यामुळे त्यांच्या जीवनाचा वाईट टप्पा सुरू झाला. दारू आणि जुगार खेळण्याच्या वाईट सवयीमुळे त्यांनी सर्व पैसे गमावले. त्या काळात त्यांनी ‘झमेला’ चित्रपट बनवला. खेदाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यामुळे त्यानंतर त्यांचे सर्व बंगले विकले गेले. जिथून त्यांनी सुरुवात केली त्याच दादरच्या चाळीत शेवटी त्यांचा मृत्यू झाला.
अधिक वाचा-
–पुण्यात पार पडणार मराठी-उर्दु गझल संमेलन; ‘या’ कलाकारांनी घेतला आहे सहभाग
–‘बिग बाॅस’फेम ‘या’ अभिनेत्याची तब्येत बिघडली, गंभीर परिस्थिती केले रुग्णालयात दाखल