बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन याला डेट करत असल्याबद्दल सबा आजाद सध्या चर्चेत आहे. सबाला अनेकदा ऋतिकसाेबत एकत्र स्पॉट करण्यात आल आहे. मात्र, यावेळी सबाचे चर्चेत येण्याचे कारण दुसरेच आहे. खरं तरं, एका मुलाखतीदरम्यान सबा आजादने तिच्या नावाबद्दल माेठा खुलासा केला आहे.
माध्यमांशी बाेलताना, सबाने खुलासा केला की, तिनं ‘सबा सिंग ग्रेवाल’ नाव बदलून ‘सबा आजाद’ का केलं. ती म्हणाली, ‘आजाद’ तिच्या आजीचे आडनाव आहे आणि त्यानंतर सबाने ‘आजाद’ला तिच्या नावाशी जाेडलं. सबाने सांगितले की, “माझ्या पासपाेर्टवर नाव सबा ग्रेवाल आहे. माझे वडील सिख, आहेत तर माझी आई मुस्लिम. परंतु त्या दाेघांनी ना माझ्यावर धर्म लादला, ना त्यांचे मत. ते दाेघेही या गाेष्टींवर कमीच विश्वास ठेवतात. आजाद माझ्या आजीचे आडनाव हाेते. मला याचा साऊंड आणि याचा अर्थ आवडला. यामध्ये स्वातंत्र्याची आस आणि मानवी प्रवृत्ती आहे. म्हणून मी हे नाव माझे स्टेज नाव म्हणून स्वीकारले.”
सबा आजाद अभिनेत्रीसह गायक देखील आहे. तिचा स्वत:चा एक बॅंड आहे. याव्यतिरिक्त सबाचे बंगळुरूमध्ये रेस्टाॅरंट आहे. मात्र, मुलाखतीत सबाने खुलासा केला की, तिला दिग्दर्शक बनायचे आहे. आता तिचे स्वप्न कधी पूर्ण हाेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
View this post on Instagram
सबाने ‘दिल कबड्डी’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘फील लाइक इश्क’ यासह अनेक दमदार चित्रपटात अभिनय केला आहे. ती शेवटची वेबसीरिज ‘रॉकेट बॉयज’मध्ये दिसली हाेती. या सीरीजमध्ये तिने परवाना ईरानीची भूमिका साकारली हाेती. या शाेमध्ये तिने जिम सरभसाेबत स्क्रीन शेअर केली हाेती. सबा आगामी काळात ‘रॉकेट बॉयज 2’ मध्ये दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ प्रसिद्ध गायकाच्या हातात हात टाकून चालताना दिसली शहनाज; चाहता म्हणाला, ‘सिद्धार्थला परत आणा’
‘मिस वर्ल्ड’ बनण्यापूर्वी ‘या’ जाहिरातीने रातोरात प्रसिद्ध झालेली ऐश्वर्या, व्हिडिओ वेधतोय लक्ष
‘मिर्झापूर’च्या ‘कालीन भैय्यां’चा मोठा निर्णय! आता कुठल्याच सिनेमात देणार नाहीत शिव्या