Saturday, July 27, 2024

हिंदुत्वाबद्दल केलेल्या ‘त्या’ ट्विटनंतर अटक केलेल्या अभिनेता चेतन कुमारला जामीन मंजूर

हिंदुत्वावर केलेल्या ट्विटमुळे वादात अडकलेल्या कन्नड अभिनेता चेतन कुमारला दिलासा मिळाला आहे. कोर्टाने त्याला दोन लोकांच्या ग्यारंटीवर आणि २५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. विवादित ट्विट केल्यानंतर शेषाद्रीपूरम पोलिसांनी त्याला अटक केली होती.

Chetan-Kumar
Photo Courtesy: Social Media

दरम्यान चेतन कुमार हा सोशल मीडियावर त्याच्या बिनधास्त आणि बेधडक व्यक्तव्यांसाठी ओळखला जातो. तो ट्विटरवर काही ना काही पोस्ट शेअर करत असतो. या पोस्टमुळे तो सतत लाइमलाईट्मधे येत असतो. या पोस्टमुळे तो अनेकदा वादांमध्ये देखील अडकला आहे. आता देखील त्याने काही दिवसांपूर्वी हिंदुत्वावर एक ट्विट केले आणि त्याचमुळे तो मोठ्या वादात अडकला आहे. या ट्विटमुळे एवढा मोठा वाद निर्माण झाला की त्याला थेट अटक कऱण्यात आली आणि १४ दिवसांची कस्टडी देण्यात आली.

तत्पूर्वी कोर्टाने चेतन कुमारला काही शर्तींवर जामीन दिला आहे. दोन लोकांच्या ग्यारंटीवर आणि २५ हजारांवर हा जामीन दिला आहे. चेतन कुमार विरोधात बजरंग दलाचे शिवकुमार यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानी चेतनच्या ट्विटमुळे हिंदू लोकांची भावना दुखावली गेल्याचे त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते. यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि त्याला अटक केली होती.

चेतन कुमारने केलेल्या ट्विटमध्ये हिंदू धर्म हा खोटे पसरवणारा धर्म असल्याचे म्हटले होते. या ट्विटमध्ये चेतन कुमारने लिहिले होते की, “हिंदुत्व हे संपूर्ण खोटेपणावर आधारित आहे. सावरकर : राम रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले तेव्हा भारतीय राष्ट्राची सुरुवात झाली – खोटं, १९९२ : बाबरी मशीद ही रामजन्मभूमी – एक खोटे, २०२३ उरीगौडा-नांजेगौडा हे टिपूचे मारेकरी – खोटे, हिंदुत्वाचा पराभव सत्याने केला जाऊ शकतो होय- सत्य म्हणजेच समता”. त्याच्या या ट्विटनंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

क्या बात है! ‘हा’ साऊथ सुपरस्टार झाला मुंबईकर, खरेदी केले तब्बल ७० कोटींचे आलिशान घर

गुपित झाले उघड! ‘टायगर 3’ मधील शाहरुखचा कॅमिओ सीन लीक, पठाणच्या मदतीने टायगर करणार पलायन

हे देखील वाचा