यावर्षीच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्याने घटस्फोटाचा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला होता. ते जोडपे इतर कुणी नसून धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या आहे. ऐश्वर्या ही रजनीकांत यांची लेक आहे. धनुष आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटानंतर ते एकत्र दिसलेच नव्हते. मात्र, आता ते दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यामागील कारण म्हणजे, घटस्फोटाच्या घोषणेनंतर ते पहिल्यांदा एकत्र दिसले आहेत. त्यांचे यादरम्यानचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, चाहतेही यामागील कारण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. चला तर जाणून घेऊया…
सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची लेक ऐश्वर्या (Aishwarya) आणि जावई धनुष (Dhanush) हे दोघेही पुन्हा एकत्र दिसले आहेत. हा आनंदाचा क्षण त्यांच्या मुलामुळे पाहायला मिळाला आहे. धनुष आणि ऐश्वर्या (Dhanush And Aishwarya) यांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुले आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाच्या शाळेत कार्यक्रम होता, त्यामुळे हे एक्स जोडपे या कार्यक्रमासाठी शाळेत उपस्थित राहिले होते.
एकत्र दिसले धनुष आणि ऐश्वर्या
या जोडप्याचा मोठा मुलगा यात्रा याच्या शाळेत धनुष आणि ऐश्वर्या यांनी हजेरी लावली होती. दोघांनाही मुलासोबत पोझ देतानाही स्पॉट करण्यात आले. याव्यतिरिक्त ऐश्वर्याने तिचा फोटोही शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या मुलाचा फोटो तिच्या फोनमध्ये काढताना दिसत आहे. ऐश्वर्याने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “दिवस सुरू करण्याची काय पद्धत आहे. शाळेतील कार्यक्रम, जिथे माझ्या मोठ्या मुलाने क्रीडा कर्णधार म्हणून शपथ घेतली.”
View this post on Instagram
याव्यतिरिक्त ट्विटरवरही एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत ऐश्वर्या ही मोठा मुलगा यात्रा, लहान मुलगा लिंगा आणि धनुष यांच्यासोबत पोझ देताना दिसत आहे. धनुषने फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. तसेच, यात्रा त्याच्या शालेय गणवेशात आहे. त्यावर क्रीडा कर्णधार लिहिले आहे. ऐश्वर्यानेही धनुषसारखाच फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट आणि पांढरी पँट परिधान केली आहे. तसेच, लहान मुलगा लिंगा याने पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टसोबत गडद काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.
जानेवारीमध्ये केली होती घोषणा
धनुष आणि ऐश्वर्या यांनी त्यांच्या घटस्फोटाची घोषणा जानेवारी महिन्यात केली होती. त्यांनी १७ जानेवारी, २०२२ रोजी घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांसोबतच कलाविश्वालाही मोठा धक्का दिला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवीच्या मागे धावला बॉयफ्रेंड, तरीही थांबली नाही अभिनेत्री; नेमकं झालंय तरी काय?
मुहूर्त ठरला! ‘पुष्पा २’ बद्दल रश्मिकाने दिली महत्वाची अपडेट, पोस्ट व्हायरल
वयाने १२ वर्षे लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती सोनाली फोगाट, वाचा किस्सा