Wednesday, March 22, 2023

घटस्फोटानंतर ऐश्वर्या रजनीकांत झाली तिच्या कामात व्यस्त, म्युझिक व्हिडिओचे करणार दिग्दर्शन

आपल्या मनोरंजन क्षेत्रासाठी एक म्हण खूपच योग्य पद्धतीने लागू पडते आणि ती म्हणजे ‘द शो मस्ट गो ऑन’. अर्थात काहीही झाले, कितीही समस्या आल्या तरीही आपले काम सुरु ठेवावेच लागते. नुकताच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार असलेल्या धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी असलेल्या ऐश्वर्याचा घटस्फोट झाला. हा घटस्फोट सर्वांसाठीच मोठा धक्का होता. मात्र आता धनुष आणि ऐश्वर्या हे वेगळे झाले असून, त्याच्या वेगळे होण्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती.

धनुष आणि ऐश्वर्या यांचा घटस्फोट झाल्यानंतर ऐश्वर्या पुन्हा तिच्या कामावर परतली आहे. ऐश्वर्या रजनीकांत तिच्या आगामी म्युझिक व्हिडिओच्या तयारीला लागली असून, ती या व्हिडिओचे दिग्दर्शन करणार आहे. हा व्हिडिओ टिप्स व्हिडिओच्या सहकार्याने तयार केला जाणार आहे. ऐश्वर्या रजनीकांतच्या वैयक्तिक जीवनात खूपच चढ उतार आले आहेत, मात्र असे असूनही ती तिच्या कामाच्या सर्व कमिटमेंट्स पूर्ण करण्यात लागली आहे. ऐश्वर्या सध्या हैद्राबादमध्ये असून, तिथेच ती तिच्या या व्हिडिओच्या प्री – प्रोडक्शनमध्ये व्यस्त झाली आहे. तिचा हा म्युझिक व्हिडिओ येत्या व्हॅलेंटाईन डे ला प्रदर्शित केला जाणार आहे. ऐश्वर्यासारखा धनुष देखील त्याच्या कामावर परतला असून, काही दिवसांपूर्वी हे दोघं एकाच हॉटेलमध्ये थांबल्याचे समजले होते.

ऐश्वर्याने तिच्या करिअरची सुरुवात तामिळ चित्रपटांपासून दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली होती. तिचा पहिला सिनेमा ‘3’ होता. या चित्रपटात धनुषसोबत श्रुती हसन देखील मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर ऐश्वर्याने तामिळ कॉमेडी ‘वाई राजा वाई’ सिनेमाचे देखील दिग्दर्शन केले होते. २०१७ साली तिचा डॉक्युमेंट्री असलेल्या ‘सिनेमा वीरन’चे सुद्धा दिग्दर्शन केले होते.

तत्पूर्वी ऐश्वर्या आणि धनुषने सोशल मीडियावर एक कॉमन स्टेटमेंट पोस्ट करत लिहिले होते की, “मैत्रीच्या रूपात, कपलच्या रूपात, आई-वडिलांच्या रूपात आणि एक दुसऱ्यांच्या शुभचिंतकांच्या रूपात १८ वर्ष सोबत राहिलो. हा प्रवास समजुदारी, वाढ, समायोजन, अनुकूल यांच्यासोबत होता. आज आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत जिथे आमचे रस्ते वेगळे होत आहे.” पुढे त्यांनी फॅन्सला आणि लोकांना त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती देखील केली.

हेही वाचा :

हे देखील वाचा