Friday, April 18, 2025
Home बॉलीवूड धर्मेंद्र यांनी सायरा बानोशी संबंधित मजेशीर किस्सा केला शेअर, म्हणाले ‘मला चित्रपट करायचा नव्हता, पण…’

धर्मेंद्र यांनी सायरा बानोशी संबंधित मजेशीर किस्सा केला शेअर, म्हणाले ‘मला चित्रपट करायचा नव्हता, पण…’

बॉलिवूडचे हिमॅन आणि सर्वात डॅशिंग हिरो म्हणून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र ओळखले जातात. अभिनेते धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील असे एक अभिनेते आहेत जे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. धरम पाजी यांच्या या अदेने त्यांच्या चाहत्यावर भुरळ घातली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र अनेकदा सोशल मीडियावर जुन्या दिवसांचे फोटो किंवा व्हिडिओ क्लिप शेअर करत आठवणींना उजाळा देत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहतेही भरभरून प्रेम करताना दिसतात.

अलीकडेच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सायरा बानोशी (Saira Banu) संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. ट्विटरवर धर्मेंद्र यांनी एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला जो ‘साजिश’ चित्रपटातील आहे. यासोबतच धर्मेंद्र (Dharmendra) यांनी सांगितले की, ते हा चित्रपट करणार नव्हते, पण सायरा बानोने हा चित्रपट करण्यास होकार दिल्यावर त्यांनी आपला निर्णय बदलला.

आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या ‘साजिश’ चित्रपटाचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, “मित्रांनो, मला या चित्रपटात काम करण्याची कधीच इच्छा नव्हती. त्यामुळे मी निर्मात्यांना सायराला साइन करण्यास सांगितले. जिला त्या काळात साइन करणे खूप कठीण होते. पण सायराने हा चित्रपट करण्यास आनंदाने होकार दिला आणि मला म्हणाली की, धरम, मी हे फक्त तुझ्यासाठी केले आहे. त्यामुळे मी काहीच बोलू शकलो नाही. आम्ही हे गाणे हाँगकाँगमध्ये शूट केले.”

‘वो बडे खुशनसीब होता है’ या गाण्याचे नाव होते. हे गाणे हाँगकाँगमध्ये शूट करण्यात आले आहे. हा चित्रपट कालिदास जे यांच्या दिग्दर्शनाखाली बनला होता. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी कार रेसरची भूमिका साकारली होती. हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदर्शित झाला होता. धर्मेंद्रच्या अलीकडील वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ते लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे.

धर्मेंद्र हे ६ मुलांचे आहेत वडील 

धर्मेंद्र यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून चार मुले, दोन मुले सनी आणि बॉबी आणि दोन मुली अजिता आणि विजेता आहेत. धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरे लग्न केले. अभिनेत्री हेमा आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि आहाना देओल ही दोन मुले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

 

 

 

हे देखील वाचा