“यह टायर तो फायर निकला… लेकिन मैं थकेगा नहीं साला”, अमोल कोल्हेंचा ‘घाम काढणारा’ Video व्हायरल

कलाकार आणि सोशल मीडिया यांचे खूपच जवळचे आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. आजच्या काळात सोशल मीडिया म्हणजे कलाकारांच्या आयुष्याचा जणू काही आरसाचा झाला आहे. याच माध्यमातून कलाकार सतत त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात असतात आणि आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींची सर्वांना माहिती देतात. सोशल मीडियामुळे देखील कलाकारांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाल्याचे अनेकदा दिसून येते.

याच सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी कलाकार सतत काहींना काही पोस्ट करताना दिसतात. याच सोशल मीडियावर मराठी काय आणि हिंदी काय सर्वच कलाकार गाजत असतात. आपले मराठी कलाकार देखील याबाबत मागे नाही. सध्या सोशल मीडियावर प्रतिभावान अभिनेते आणि राजकारणी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

कलाकार त्यांचा फिटनेस जपण्यासाठी सतत जिममध्ये घाम गळताना दिसतात. हार्ड वर्कआऊट करताना कलाकारांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच अमोल कोल्हे यांचा देखील जिममधला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते अतिशय कठीण व्यायाम खूपच सहज करताना दिसत असून, त्यांना आलेला प्रचंड घाम देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमधून त्यांचा स्टॅमिना आणि फिटनेस, व्यायमाबाबत त्यांचे प्रेम अगदी स्पष्ट दिसून येत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अमोल कोल्हे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “यह टायर तो फायर निकला…लेकिन मैं थकेगा नहीं साला…लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हतं की टायर असा घाम काढेल”

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

त्यांच्या या व्हिडिओवरून अनेकांना व्यायामासाठी प्रेरणा मिळत आहे तर कॅप्शनवरून सर्वांचेच हसू निघत आहे. भंगार म्हणूनपूर्वी फेकण्यात येणाऱ्या टायरचा असा वापर आणि त्याला दिलेले हे कॅप्शन सर्वच नेटकऱ्यांचे आणि कलाकारांचे लक्ष वेधून घेत आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल अधिक सांगायचे झाल्यास. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज या मालिकेने अमाप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ते छत्रपती संभाजी महाराज या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकले. नुकतेच त्यांना ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पहिले गेले होते. अभिनयात असण्यासोबतच अमोल कोल्हे राजकारणात देखील सक्रिय आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

Latest Post