Sunday, June 23, 2024

गोविंदाच्या अकाऊंटवरील हिंदूसंदर्भातील ‘त्या’ पोस्टवरुन वाद; अभिनेता म्हणाला, ’18 वर्षांपूर्वी राजकारण सोडले, परत…’

सध्या हरियाणामध्ये वातावरण तपले आहे. हरियाणा दंगलीचा सामना करत आहे. अनेक कलाकार याबद्दल सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या यादीत गोविंदाच्या नावाचाही समावेश आहे. गोविंदाने मुस्लिमांचे दुकान जाळल्याबद्दल हिंदूंवर टीका करणारं एक ट्वीट केलं. त्या ट्विटरमुळे अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. हे प्रकरण एवढं वाढलं की, याचा मोठा फटका गोविंदाला बसला. यानंतर अभिनेत्याने लगेचच त्याच्या ट्विटर हँडलचे नाव बदलले.

झालं असं की, गुरुवारी गोविंदाने (Govinda) गुरुग्राममध्ये झालेल्या हिंसाचारावर केलेल्या ट्विटने सर्वत्र खळबळ उडाली. गोविंदाने दंगलीदरम्यान एका दुकानात झालेल्या तोडफोडीचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “आपण कुठे पोहोचलो आहोत? त्यांच्याबद्दल लाज वाटते जे स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात आणि अशी कृत्ये करतात. शांतता निर्माण करा. आपण लोकशाही आहोत.” यानंतर हे ट्विट व्हायरल झाले. यासाठी गोविंदाला ट्रोलही केले.

Govinda

त्यानंतर, गोविंदाने आधी त्याचे ट्विट डिलीट केले, नंतर त्याचे ट्विटर अकाउंट डिलीट केले. यासोबतच त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून आपले अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आणि आपण हे ट्विट केले नसल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणानंतर गोविंदा म्हणतो की, “मी अनेक वर्षांपासून ट्विटर केलेले नाही. मला ट्विटर कसे वापरायचे हे देखील माहित नाही. माझे खाते हॅक झाले होते, ज्याचा अहवाल सायबर क्राइमला लिहिला आहे. आणि मी18 वर्षांपूर्वी राजकारण सोडले आहे. मला त्यात परत येण्यासाठी ट्विट करण्याची गरज नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

 ते म्हणाले, “माझ्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज निर्माण व्हावा म्हणून हे कोणीतरी केले. मला हरियाणात शो मिळू शकले नाहीत, काम मिळू शकले नाही. माणसाला सगळीकडून प्रेम मिळाल्यावर अनेकांना वाईट वाटते. लोकांनी मला राजकारण आणि त्यांच्या अजेंडापासून दूर ठेवावे अशी माझी इच्छा आहे. मी कोणाच्याही राजकारणात गेलो नाही. तसेच मला कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही. या सर्व गोष्टींमुळे माझ्या चित्रपटांना थिएटर्स मिळाले नाहीत, मी खूप प्रवास केला आहे.(actor govinda on gurugram nuh violence said my twitter account hacked i quit politics 18 years ago)

हे देखील वाचा