Thursday, June 13, 2024

कृष्णाने मामा गोविंदाची काढली आठवण, व्हिडिओ शेअर करून सांगितला बालपणीचा ‘ताे’ किस्सा

टीव्ही अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक अनेकदा त्याच्या मामा गोविंदाबद्दल जुने किस्से सांगताे, ज्यांच्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहतो. कृष्णा आणि गोविंदा यांच्यात अनेकदा वाद होतात. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वैर देखील आहे, जे संपण्याचे नाव घेत नाही. अशात कृष्णाला अनेकदा गोविंदाची आठवण येत असते. दरम्यान कृष्णाने साेशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मामा गाेविंदाची आठवण काढली आहे. काय म्हणाला काॅमेडियन? चला, जाणून घेऊया…

कृष्णा (krushna abhishek) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओसाेबत कृष्णाने कॅप्शनमध्ये एक किस्सा देखील शेअर केला आहे. कृष्णा सांगताे की,’मी माझा मामा गोविंद यांच्यासोबत सेटवर जायचो आणि त्यांचा नाच आणि अभिनय पाहायचो तेव्हा मला ते खूप आवडायचे आणि आज मला सेटवर तेच करताना खूप आनंद होत आहे.

कृष्णाला अनेकदा गोविंदाची आठवण येत असते. अशात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा गोविंदांची आठवण काढली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कृष्णा डान्स करताना दिसत आहे, ज्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krushna Abhishek (@krushna30)

कृष्णाचा हा डान्स व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओवर युजर्स भन्नाट कमेंट करत असून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (comedian krushna abhishek reveals he use to travel with mama govinda on sets know the reason why)

अधिक वाचा-
पहचान कौन! बाॅलिवूडच्या ‘या’ सुपर हॉट अभिनेत्रीने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल
‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा