Monday, October 2, 2023

वेतन समानतेवर काजोलने मांडले मत; म्हणाली, ‘भारत प्रगती करत आहे, पण…’

‘बाजीगर’, ‘करण अर्जुन’, ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सारखे अजरामर चित्रपट करणारी सुप्रसिध्द अभिनेत्री काजोल होय. आपल्या अभिनयामूळे ती सर्वत्र प्रचलित आहे. ती एक चांगली कलाकार असुन एक उत्तम व्यक्ती देखील आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांना वेळोवेळी सामाजिक मूद्यांवर भाष्य करतांना, त्यांच्या प्रतिक्रया मांडून लाइमलाइटमध्ये येतांना आपण पाहात असतो. बॅालिवुड इंडस्ट्रीत मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘वेतन समानता’ या विषयी काजोलने देखील आपले मत मांडले आहे.

काही दिवसाखाली प्रदर्शित झालेली वेब सीरीज “द ट्रायल: प्यार, कानून, धोका” या चित्रपटातद्वारे काजोल (Kajol) प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या वेब सीरीजमध्ये काजोलने केलेल्या कामाची चांगलीच प्रशंसा करण्यात आली आहे. एका इवेंटमध्ये काजोल ओटीटी प्लॅटफाॅम आणि सिनेमा या दोन्हीमधील फरक समजाऊन सांगत होती. त्यावेळी बोलताना ती म्हणाली की, “ओटीटी प्लॅटफाॅमवरती काम करण्यासाठी जास्त वेळ मिळतो, ज्यामुळे सीरिजच्या कंटेंटवरती चांगल्या प्रकारे काम करता येते. तर चित्रपटांमध्ये एक फिल्म अडीच तासामध्ये संपवावी लागते. त्यामुळे तेव्हड्याच वेळेमध्ये सगळ्या गोष्टी करणे थोडे अवघड जाते.”

माध्यमांशी बोलताना यावर काजोलने उत्तर दिले की, “भारत प्रगती करत आहे.” सोशल मीडिया आणि ओटीटी यांच्यामुळे लोकांना विविध प्रकारचे सिनेमे पाहायला मिळत आहेत. आपण चांगले विचार करत आहोत आणि यापेक्षा चांगले होइल अशी अपेक्षा करत आहोत.जेव्हा तुम्ही भारतासाठी ‘वंडर वुमन’ बनवायला सुरुवात कराल आणि ती ‘पठाण’ प्रमाणेच बनवता तेव्हा कदाचित वेतनात समानता येईल.”

यापुढे काजोल बोलताना म्हणाली की, “प्रत्येक गोष्ट आज सोशल मिडीयावर उपलब्ध आहे. यामुळे चित्रपटांचे कलाकार लोकांच्या सोबत असतात. हा एक सगळ्यात मोठा बदल आहे. एका बाजूने ही एक चांगली गोष्ट आहे. तर दुसऱ्या बाजुने आम्ही कलाकारांनी काहीतरी हरवलय असे वाटते. पण हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. कारण की तुम्ही या गोष्टीला कशा प्रकारे पाहाता.” (Famous actress kajol on pay parity said it will be achieved when we make wonder woman like film as well as srk pathaan)

अधिक वाचा- 
जरा इकडे पाहा! गुलाबी रंगात खुलले आलियाचे सौंदर्य
सुरुवातीला सावळ्या रंगामुळे व्हायची ट्रोल, तर आज एका चित्रपटासाठी घेते 5-6 कोटी; वाचा ‘सिमरन’ काजोलचा जीवनप्रवास

हे देखील वाचा