बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे त्यांच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. सोमवारी (दि. 24 ऑक्टाेबर)ला या बॉलिवूड कपलने ऋतिक रोशनच्या घरी दिवाळी साजरी केली. सबा आझाद हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली. सबाने ऋतिकसोबतचा फोटो शेअर करुन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि ऋतिकच्या घरी होत असलेल्या दिवाळी सेलिब्रेशनची झलकही शेअर केली.
सबा (Saba Azaad) हिने ऋतिक(Hrithik Roshan) सोबत एक गोंडस सेल्फी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये हे जोडपे पांढऱ्या पोशाखात ट्विनींग करताना दिसत आहे. या फोटोसोबत सबाने “हॅपी दिवाळी” असे कॅप्शन दिले. या फोटोशिवाय सबाने अनेक दिव्यांचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोवर सबाने ऋतिकची भाची सुरनिका सोनीसाठी एक लव्ह नोटही लिहिली आहे. सबाने लिहिले, “दिवा लावण्यासाठी आमचे प्रयत्न कॅमेऱ्यात टिपल्याबद्दल सुरनिका धन्यवाद”.

सुर्निका सोनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सबा आणि ऋतिकसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. दिवाळीला ऋतिक रोशनसोबत त्याची चुलत बहीण पश्मिना रोशन आली होती. पश्मिना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पश्मिनाने आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतानाचे फोटोही शेअर केले आहेत. ऋतिकने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याची मुले हरेन रोशन आणि हृदयन रोशनही दिसत होते.

साबा आझाद आणि ऋतिक रोशन याआधी अनेकदा एकत्र दिसले आहेत. हे जोडपे रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या रिसेप्शनमध्ये देखील एकत्र पोहोचले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसली होती. ऋतिक रोशनने 2000 मध्ये इंटीरियर डिझायनर सुजैन खानशी लग्न केले आणि 2014 मध्ये हे जोडपे वेगळे झाले, परंतु तरीही हे दोघे मुलांचे संगोपन करतात.
ऋतिक रोशनच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर ऋतिक अखेरचा ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात दिसला हाेता. या चित्रपटातील ऋतिकच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलिया भट्टने नीतू कपूरसोबत थाटामाटात साजरी केली पहिली दिवाळी; चाहते म्हणाले,’परफेक्ट फॅमिली …’
राहुलच्या त्रासामुळे डिप्रेशनच्या आहारी गेली होती वैशाली ठक्कर, फोटो व्हायरल होण्याचे मोठे कारण










