Thursday, July 18, 2024

राहुलच्या त्रासामुळे डिप्रेशनच्या आहारी गेली होती वैशाली ठक्कर, फोटो व्हायरल होण्याचे मोठे कारण

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने (दि. 16 ऑक्टोंबर) दिवशी राहत्याघरी गळफास घेऊन आत्माहत्या केली होती, मात्र या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलसे होत आहेत. तिने लिहिलेल्या पत्रामध्ये थेट तिने आत्माहत्या का करत आहे याचे कारणही लिहिले होते. पण तरीही नुकतंच अभिनेत्रीच्या जवळच्या मित्र निशांत मल्कानी याने अनेक नवीन गोष्टींचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री वैशाली ठक्कर (Actress Vaishali Thakkar) हिच्या आत्माहत्या प्रकरणी तिचा जवळचा मित्र निशांत मल्कानी (Nishant Malkani) याने मीडियाला दिलेल्या माहितीनुसार एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “वैशाली डिप्रेशनच्या आहारी गेली होती. तिचा इलाज करण्यासाठी तिने मेडिकल साइकेट्रिस्टची मदतही घेत होती.” त्याने पुढे सांगितले की, “जेव्हा तुम्ही कोणत्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही कितीही जवळ गेला तरी तुम्हाला साधी गोष्ट वाटते आणि जर ब्रेकअपनंतर तुम्ही जर जवळ आलेल्या फोटोंना व्हायरल करण्याची धमकी देत असाल तर त्या व्यक्तीची परिस्थिती कशी असू शकते. राहुलनेही असेच केले होते. तो वैशालीच्या होणाऱ्या नवऱ्याला हे फोटो दाखवणार होता. मला आता वैशालीची अवस्था समजली होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

निशातंने मुलाखतीदरम्यान सांगतिले की, “वैशाली लग्नाअगोदरच मुंबईला येणार होती. आत्माहत्याच्या चार दिवस पूर्वीच माझे आणि वैशालीचे बोलने झाले होते. तिने सांगितले होते की, मी तिला तिच्या वजनामुळे चिडवत होतो की, तिने तिचे वजन कमी केले आहे, यावर उत्तर देत ती सांगायची की, मी वाढवेल माझं वजन.” यानंतर त्याने अनेक गोष्टी सांगितल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

निशांतने राहुल आणि वैशालीच्या नात्याविषयी बोलताना सांगितले की, “जेव्हा दोघांनी डेट करायला सुरुवात केली होती, तेव्हा राहुलचे लग्न झाले नव्हते. ते दोघेही एकमेकांसोबत लग्न करणार होते. मात्र, त्यांचे आई-वडील या नात्यापासून खुश नव्हते त्यामुळे या दोघांचे लग्न झाले नाही. यानंतर राहुलचे लग्न झाले, पण तरीही तो वैशालीला मानसिकरित्या ब्लॅकमेल करु लागला आणि त्यामुळे तिने आत्माहत्या केली.”

वैशालीने अनेक दिवस रहुलचा त्रास सहन केला, तिच्यामुळे तिचे आई-वडील देखिल खूपच चिंतेत होते. तिला तिच्या अई-वडिलांचे दु:ख बघवेनासे झाले आणि शेवटी तिने आपल्या राहत्या घरी इंदौरमध्ये गळफास घेऊन आत्माहत्या केली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नयनताराने दिवाळीच्या मुहूर्तावर दाखवली जुळ्या मुलांची पहिली झलक; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
भारत-पाकिस्तान सामन्याचा आयुष्मानने शेअर केला रंजक किस्सा, जाणून घ्या एका क्लीकवर

हे देखील वाचा