Monday, June 17, 2024

जरा इकडे पाहा! गर्लफ्रेंड सबा आजादसोबत ऋतिक रोशनला पाहून चाहते म्हणाले, ‘बाप-लेकीची जोडी…’

बॉलिवूड लोकप्रिय अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan)त्याच्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याचा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाशिवाय ऋतिक त्याच्या लव्ह लाईफमुळेही चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतो. ऋतिक रोशन आणि सबा आजाद डेट करत आहे. ऋतिक सबासोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाही. अलीकडेच तो त्याची गर्लफ्रेंड सबासोबत मुंबईत स्पॉट झाला होता. दोघांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. मात्र, या दोन्ही लव्ह बर्ड्सना एकत्र पाहून चाहत्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल बोलायचे झाले तर, ऋतिक रोशन (Hritik Roshan) आणि सबा एकत्र बिल्डिंगमधून बाहेर निघून कारमध्ये बसत असतात. तितक्यात, पॅपराजी त्या दोघांना बोलावते आणि ते दोघेही पॅपराजीला पोज देण्यासाठी उभे राहतात. ऋतिकच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, ऋतिक नेहमीप्रमाणे काळ्या रंगाच्या पोशाखात सुंदर दिसत आहे आणि सबाने डेनिम जीन्स आणि निळा क्रॉप टॉप घातला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ऋतिक आणि सबा एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत पण सोशल मीडिया यूजर्स दोघांनाही एकत्र पाहून फारसे खूश नाहीत. सोशल मीडियावर दोघांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले, “तुम्हाला ती कुठून मिळाली?” दुसर्‍या यूजरने लिहिले, “बाप -लेकी दिसत आहे दोघे.” एकाने लिहिले की, ‘ऋतिक भाऊ तुम्ही हिच्यापेक्षा चांगले आहात.’ तर तिसऱ्या चाहत्याने कमेंट करत लिहिले, “तुमची मुलगी दिसत आहे.”

ऋतिक रोशनचे पहिले लग्न सुजैन खानसोबत झाले होते, पण 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. तरी, आजही
दोघे त्यांच्या दोन मुलांमुळे एकमेकांच्या संपर्कात आहेत. मात्र, दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. ऋतिक सबासोबत आहे आणि सुजैन खान अर्सलान गोनीला डेट करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! प्रभासने शेअर केला ‘आदिपुरुष’ सिनेमाचा पोस्टर, ‘या’ दिवशी रिलीज होणार टीझर
‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात ठार वेडा झालेला चाहता, आख्खी जमीनच करून बसला होता नावाव

हे देखील वाचा