Tuesday, June 25, 2024

‘बिग बॉस १५’मधून बाहेर पडलेल्या स्पर्धकाचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘हा शो विवाहित पुरुषांसाठी…’

अभिनेता जय भानुशाली (Jay bhanushali) हे टीव्हीवरील लोकप्रिय नाव आहे. अलीकडेच तो ‘बिग बॉस १५’ च्या घरात दिसला होता. शोच्या सुरुवातीला जयला सर्वात पॉवरफुल स्पर्धक मानले जात होते. खेळ असो वा करमणूक अभिनेता सगळ्यांच्या पुढे. काही पाहुण्यांनी असेही सांगितले की, जय हा शो जिंकू शकतो, पण शोच्या काही आठवड्यांनंतरच एका धक्कादायक निर्णयाने त्याला शोमधून बाहेर काढले. जयची हकालपट्टी त्याच्या कुटुंबासाठी तसेच चाहत्यांसाठी आश्चर्यकारक होती. जयला दर आठवड्याला तो कंटाळवाणा आणि आक्रमक दिसत असल्याचे सलमान खान म्हणत आल्यामुळे जयही खूप नाराज दिसला होता.

आता घराबाहेर पडून जयने या सर्व टीकेला उत्तर दिले असून, आपल्या खेळाबाबत खुलेपणाने बोलले आहे. माध्यमांशी बोलताना जय म्हणाला, “पहिले दोन आठवडे हा खेळ माझ्याभोवती फिरत होता. मला असेही सांगण्यात आले की, मी विजेता होऊ शकतो. घरात गेल्यावर मी घरात सर्वात जास्त मनोरंजन करणार असा विचार करून गेलो. त्यानंतर मी एकटा पडलो आणि मला सांगण्यात आले की, मी काहीही करत नाही. मी करत होतो तेव्हाही आणि करत नसतानाही, पण सगळे काही करत नव्हते म्हणून सगळ्यांना बोला ना. मी गोंधळलो आणि मला विचारायचे होते की, काय करावे. या पर्वातील विजेत्याचे पॅरामीटर्स मागील पर्वापेक्षा खूप वेगळे आहेत.”

“हा शो विवाहित पुरुषासाठी नाही. आपण घरामध्ये काय करू शकतो? हा मुद्दा मांडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. माझी पत्नी माहीही घरात असती, तर मला खेळ खेळणे सोपे झाले असते. आतमध्ये तुम्ही टीव्हीवर कसे दिसता यावर दबाव असतो. मी एक कौटुंबिक माणूस आहे आणि हे माझ्यासाठी प्राधान्य आहे. गेल्या २ महिन्यांपासून मी माझी मुलगी तारा हिला वेळ देऊ शकलो नाही, त्यामुळे आता काही दिवस मी तो गमावलेला वेळ भरून काढणार आहे,” असेही तो म्हणाला.

‘बिग बॉस १५’ मध्ये जयसोबत दोघेजण निघाले बाहेर
‘बिग बॉस १५’ शोमध्ये जयची एन्ट्री मोठ्या धमाकेदारपणे झाली होती, परंतु जय बिग बॉसच्या घरात काहीही आश्चर्यकारक दाखवू शकला नाही. त्याने या शोमध्ये फार काही केले नाही. त्यामुळे त्याला वीकेंड का वारमध्ये सलमान खानकडून फटकारलेही गेले. जय भानुशाली, विशाल कोटियन आणि नेहा भसीन या तिघांनाही वीकेंड का वार नंतर शोच्या एव्हिएशनच्या दिवशी धक्कादायक एलिमिनेशन मिळाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रणवीरचे कपडे घातले का?’, म्हणत एयरपोर्ट लूकवरून दिपीका पदुकोण ट्रोल

-ही प्रेमात बिमात पडली की काय? सुकेश चंद्रशेखरच्या गालावर किस करताना जॅकलिन फर्नांडिसचा फोटो व्हायरल

-‘सध्या बोलू शकत नाही, व्हॉट्सऍप करा’, म्हणणाऱ्या उर्फीच्या फोटोवर युजरची झक्कास कमेंट, एकदा वाचाच

हे देखील वाचा