Monday, June 24, 2024

ही प्रेमात बिमात पडली की काय? सुकेश चंद्रशेखरच्या गालावर किस करताना जॅकलिन फर्नांडिसचा फोटो व्हायरल

बॉलिवूड कलाकारांच्या आयुष्यात काय चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत माहिती आपल्याला मिळतच असते, परंतु ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात हे सगळ्यांना जाणून घ्यायचे असते. अशातच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा २०० कोटीची फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. अशातच तिचा पुन्हा एकदा सुकेश चंद्रशेखरसोबत एक रोमँटिक फोटो समोर आला आहे.

जॅकलिनचा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सुकेश आरशात सेल्फी काढत आहे. जॅकलिनने त्याला मिठी मारली आहे आणि त्याला गालावर किस करत आहे. सुरेश चंद्रशेखरने मनी लॉंड्रिंग प्रकरणात २०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांच्यातील जवळीक पाहून याआधी ईडीने जॅकलिनची चौकशी देखील केली आहे. (Jacqueline Fernandez kiss To conman Sukesh chandrashekhar, photo viral on social media)

हाती आलेल्या माहितीनुसार, जॅकलिन आणि सुकेशची चेन्नईमध्ये चार वेळा भेट झाली होती. त्यांच्यासाठी एका प्रायव्हेट जेटची व्यवस्था देखील केली होती. सध्या व्हायरल होत असणाऱ्या फोटोमध्ये त्या दोघांमधील बॉंडिंग स्पष्ट दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा फोटो चेन्नईमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील आहे. सुकेश ज्या फोनमध्ये फोटो काढत आहे, तो आयफोन १२ प्रो आहे. हा तोच फोन ज्यात इस्राईलमधील सिमकार्डचा वापर करून त्याने २०० कोटी रुपयांची वसुली केली होती.

 

मागील काही दिवसांपूर्वी जॅकलिन आणि सुकेश रिलेशनमध्ये आहेत, अशी बातमी येत होती. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता जॅकलिन सुकेशला किस करतानाचा फोटो समोर आल्याने पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनच्या बातम्यांनी वेग घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! ‘छोरी’ फेम नुसरतसोबत घडली विचित्र घटना, ३० सेकंदात सोडावं लागलं अभिनेत्रीला हॉटेल

-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

-अरे देवा! पुन्हा पोस्टपॉन झालं आलिया अन् रणबीरचं लग्न, काय आहे नेमकं कारण?

हे देखील वाचा