Saturday, June 15, 2024

‘सध्या बोलू शकत नाही, व्हॉट्सऍप करा’, म्हणणाऱ्या उर्फीच्या फोटोवर युजरची झक्कास कमेंट, एकदा वाचाच

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आजकाल ती तिच्या अभिनयासाठी कमी आणि तिच्या विचित्र कपड्यांसाठी जास्त ओळखली जाते. आपल्या आऊटफिट्समुळे चर्चेत असलेल्या उर्फीने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्फीने मंगळवारी (३० नोव्हेंबर) एक सुंदर फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उर्फीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे, ज्यात उर्फीने डोळ्यांवर चष्मा घातला आहे आणि एका हाताने तिची जीन्स पकडली आहे. या फोटोवर तिने लिहिलेले कॅप्शन सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

उर्फीने लिहिले, ‘सध्या बोलू शकत नाही’
उर्फीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सध्या बोलू शकत नाही, फक्त व्हॉट्सॲप करा.” हे लिहिताना तिने पुढे सनस्किड हा हॅशटॅग वापरला आहे.

उर्फीच्या या फोटोवर त्याचे चाहते जोरदार कमेंट करत आहेत. या फोटोला आतापर्यंत २० हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक केले आहे. यावर चाहत्यांच्या कमेंट्स सातत्याने येत आहेत.

युजरने लिहिले ‘नंबर द्या’
उर्फीच्या या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “तुमचा नंबर द्या.” त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, “या उर्फी बिग बॉसमध्ये ये, तुझ्याशिवाय मजा नाही.” या फोटोवर उर्फीचे चाहते तिला ‘हॉट’, ‘सेक्सी’ आणि ‘सुंदर’ म्हणत आहेत. युजर्सने हार्ट इमोजी बनवून या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले की, “तुझा नंबर दे, तरच आरामात बोलू.”

उर्फी एक उत्तम गायिका देखील आहे, हे फार कमी चाहत्यांना माहिती आहे. तिला रॅपिंग आवडते. मुंबईत येण्यापूर्वी उर्फीने काही दिवस दिल्लीतील एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणूनही काम केले आहे. उर्फी जावेदने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्ही शो ‘डेढी-मेढी फॅमिली’मधून केली होती. यानंतर ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘नामकरण’, ‘मेरी दुर्गा’ आणि ‘जीजी माँ’ यांसारख्या मालिकांमध्ये काम करून तिने तिची छाप पाडली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! ‘छोरी’ फेम नुसरतसोबत घडली विचित्र घटना, ३० सेकंदात सोडावं लागलं अभिनेत्रीला हॉटेल

-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

-अरे देवा! पुन्हा पोस्टपॉन झालं आलिया अन् रणबीरचं लग्न, काय आहे नेमकं कारण?

हे देखील वाचा