Saturday, June 15, 2024

‘रणवीरचे कपडे घातले का?’, म्हणत एयरपोर्ट लूकवरून दिपीका पदुकोण ट्रोल

सोशल मीडिया हे अतिशय वेगवान आणि दूरपर्यंत पोहोच असणारे माध्यम असून, सोशल मीडियामुळे जग अतिशय जवळ आले आहे. कलाकार आणि फॅन्स यांच्यामधील दुवा म्हणून सोशल मीडिया हे माध्यम ओळखले जाते. या माध्यमामुळे कलाकार आणि फॅन्समधील संवाद देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र याच माध्यमातून कलाकरांना ट्रोल करण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. नेहमी कोणते ना कोणते कलाकार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येतात आणि त्यांना सोशल मीडियावर अगदी लहानातल्या लहान कारणापासून ते मोठ्यातल्या मोठ्या करणापर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी ट्रोल केले जाते.

ट्रोलिंग ही आता खूपच सामान्य बाब झाली आहे. रोज कोणता ना कोणता कलाकार नेटकऱ्यांना ट्रोल करण्यासाठी सापडत असतो. आता बॉलिवूडची मस्तानी दिपीका पदुकोण नेटकऱ्यांना ट्रोल करण्यासाठी सापडली आहे. नुकतेच दिपीकाला एयरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. तिचा एयरपोर्ट लूकवर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. दिपीकाला स्पॉट केले गेले तेव्हा, तिने चेहऱ्यावर मास्क लावला होता. दिपीकाने निळ्या रंगाचा ओव्हरसाईझ प्रिंटेड डेनिम जॅकेट आणि हलक्या निळ्या रंगाची डेनिम जीन्स घातली आहे. तिने या ड्रेसवर हाय हिल असलेली काळ्या रंगाची सॅंडल घातली असून, जी तिच्या ड्रेसवर अजिबात सूट होत नाहीये. तिच्या या लूकमुळे तिला आता ट्रोल केले जात आहे.

तिच्या या लूकवर कमेंट करताना एकाने लिहिले, “रणवीरचे कपडे घातले का ताई?”, अजून एकाने लिहिले, “हिल्ससोबत नक्की काय झाले?”, एकाने लिहिले, “दिपीकाला का असे वाटत आहे की, हिल्ससोबत मोजे घालणे फॅशन आहे.”, अजून एकाने लिहिले, “दिपीकाला आता नव्या स्टायलिस्टची गरज आहे.”, एकाने लिहिले, “सँडल्ससोबत मोजे खूपच भयंकर दिसत आहे.” तर एकाने सर्वांना सल्लाच दिला की, तिचा लूक कोणी फॉलो करू नये. दिपीका आणि रणवीर ही जोडी तुफान लोकप्रिय आहे. नेहमी रणवीरला त्याच्या स्टाईलवरून आणि कपड्यांवरून ट्रोल केले जाते, मात्र ह्यावेळेस दिपीकाला तिच्या ड्रेसवरून ट्रोल केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कंगनाने दाखल केली एफआयआर, म्हणाली ‘मी फालतू धमक्यांना घाबरत नाही’

-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री

-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती

हे देखील वाचा