जितेंद्र यांना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते फक्त ‘इतके’ रुपये; तर ६ महिने मिळाला नव्हता पगार


अभिनेते जितेंद्र कपूर हे बॉलिवूडमधील त्या कलाकरांपैकी एक आहेत, ज्यांनी बऱ्याच काळापासून स्टारडम पाहिला आहे. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जितेंद्र यांच्या चित्रपट कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ बराच संघर्षमय होता. जितेंद्र सुरुवातीच्या काळात मुंबईतील एका चाळीत राहत होते. जितेंद्र महाविद्यालयात शिकत होते, त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर घर चालवणे कठीण झाले, म्हणून जितेंद्र यांना स्वतःहून काम सुरू करायचे होते.

जितेंद्र यांना प्रथम ज्युनिअर कलाकार म्हणून काम मिळाले. त्यांना हे काम चित्रपट निर्माते शांताराम यांनी दिले होते. त्यांना सांगण्यात आले की, ज्या दिवशी कोणताही ज्युनिअर कलाकार येणार नाही, त्यांना त्यादिवशी कामावर घेतले जाईल आणि त्यांना दर महिन्याला १०५ रुपये दिले जातील.

पहिल्या ब्रेकच्या बदल्यात मिळाले कमी पैसे
मिळालेल्या माहितीनुसार, हळूहळू जितेंद्र शांताराम यांना आवडायला लागले होते. ‘गीत गाया पत्थरों ने’ यासाठी शांताराम यांनी जितेंद्र यांना साईन केले होते. या चित्रपटात शांताराम यांनी रवी कपूरचे नाव जितेंद्र असे ठेवले. जितेंद्र यांना चित्रपट मिळाला, पण त्यांना ब्रेक देण्यात आला. त्यामुळे पैसे कमी झाले. त्यांना दर महिन्याला १०० रुपयांवर साईन केले. परंतु पहिल्या ६ महिन्यांसाठी त्यांना पैसे दिले गेले नाहीत.

दीर्घ संघर्षानंतर मिळाली ओळख
जितेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप मेहनत घेतली होती. त्यानंतर १९६७ मध्ये त्यांना ‘फर्ज’ चित्रपटातून एक नवीन ओळख मिळाली. या चित्रपटातील ‘मस्त बहारों का मैं आशिक’ हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. अशाप्रकारे जितेंद्र ‘जंपिंग जॅक’ बनले होते. यानंतर त्यांनी ‘हमजोली’ आणि ‘कारवां’ यांसारखे चित्रपट केले आणि ते सुपरस्टार बनले.

बालाजी टेलिफिल्म्स आणि बालाजी मोशन पिक्चर्सचे चेअरमन
त्याचबरोबर जितेंद्र आता बालाजी टेलिफिल्म्स आणि बालाजी मोशन पिक्चर्सचे चेअरमन आहेत. त्यांची मुलगी एकता कपूरने चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात वेगळे स्थान प्राप्त केले आहे. तसेच मुलगा तुषार कपूरही अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन


Leave A Reply

Your email address will not be published.