चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या कंगना रणौतला एक मोठा चित्रपट मिळाला आहे. बऱ्याच दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की, करीना कपूर खानने सीतेच्या भूमिकेसाठी १२ कोटी फीची मागणी केली होती. मात्र, आता कंगना रणौतला ही भूमिका मिळाल्याची माहिती मिळाली आहे. ‘सीता-एक अवतार’ नावाचा हा चित्रपट अलौकिक देसाई दिग्दर्शित करणार आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.
या चित्रपटाच्या कलाकारांच्या घोषणेसह चाहते सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत. काही चाहत्यांनी तर कंगना या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. कंगना रणौतनेही सोशल मीडियाद्वारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चित्रपटाचे लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद आहेत. ‘सीता’ची भूमिका साकारण्यासाठी कंगना ही त्यांची पहिली पसंती आहे.
https://www.instagram.com/p/CTy–KzskbQ/?utm_source=ig_web_copy_link
चित्रपटाचे दिग्दर्शक अलौकिक यांनी लिहिले की, “सीता आरंभ, ब्रह्मांड त्या लोकांची मदत करतात, जे लोक विश्वासाने समर्पण करतात. मृगतृष्णा काय होती ते आता स्पष्ट झाले आहे. एका पवित्र नात्याचे स्वप्न जे कधीही शोधले गेले नाही, ते आता एक सत्य आहे. कंगनाला ‘सीता एक अवतार’मध्ये कास्ट करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. हा पवित्र प्रवास पौराणिक कथांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलून टाकेल.”
माता सीतेच्या पात्राबद्दल या दिवसांत बरेच चित्रपट प्री- प्रोडक्शनमध्ये आहेत. ‘तान्हाजी’चे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’मध्ये मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या समोर सीतेची भूमिका साकारण्यासाठी क्रिती सेननची निवड करण्यात आली आहे. हा चित्रपट हिंदू महाकाव्य ‘रामायण’वर आधारित आहे आणि प्रभास भगवान राम आणि सैफ अली खान लंकेश रावणाच्या भूमिकेत दिसतील. ‘भवई’ चित्रपटात सीतेची भूमिका ऐन्द्रिता रे साकारत आहे.
कंगना सध्या तिच्या ‘थलायवी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. जरी त्याचा हिंदी व्हर्जन बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. ‘थलायवी’ चित्रपटाची सुरुवातच सुस्त होती. पहिल्या दिवशी चित्रपटाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. कंगनाचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट हिंदी व्हर्जनमध्ये पहिल्या दिवशी केवळ २५ लाख रुपये कमवू शकला. ‘थलायवी’ची संपूर्ण कथा जयललितांच्या जीवनाभोवती फिरते. जयललितांचे पात्र साकारण्यासाठी कंगनाने खूप मेहनत घेतली आहे आणि ती यशस्वीही झाली आहे.
करीनावर झाली जोरदार टीका
करीना कपूर खान सीतेची भूमिका साकारणार असल्याची बातमी आल्यापासून, सोशल मीडियावर तिचा निषेध करायला सुरुवात केली होती. नेटकऱ्यांनी सांगितले की, जर करीनाने सीतेची भूमिका साकारली, तर तो हिंदू धर्माचा आणि माता सीतेचा अपमान होईल.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रिया बापटने केला लाडू बनवतानाचा व्हिडिओ शेअर; ‘हा’ कलाकार म्हणाला, ‘मला पण पाहिजे’
-‘आली गौराई अंगणी…’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री समिधाने सुंदर फोटो केले शेअर; एकदा पाहाच